Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांहस्ते गोवा अन्नसंस्कृती पुस्तकाचे प्रकाशन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील पारंपरिक पाक संस्कृतीच्या संवर्धनासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरीतील सचिवालयात माहिती आणि प्रसिद्धी खात्याने प्रकाशित केलेल्या ‘गोवा अन्नसंस्कृती’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर केले.

आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी आधुनिकीकरणाच्या जलद गतीमुळे गोव्यातील खाद्यसंस्कृतीतील खऱ्या पारंपारिक पाकशास्त्राचा ऱ्हास होत आहे असे सांगितले. खेडेकर यांनी लिहिलेले हे पुस्तक गोव्यातील प्रामाणिक खाद्यसंस्कृती आणि पाककृती तंत्रांचे महत्त्व प्रतिपादते. तरुण पिढीने हे पुस्तक वाचावे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात पारंपारिक पाककृतींचा प्रचार करावा असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हे पुस्तक गोव्याच्या अन्न संस्कृतीवर प्रकाश टाकते. गोव्याची खाद्य संस्कृती तांदूळ, नारळ आणि समुद्री खाद्यपदार्थांशी जोडलेली आहे आणि हे खाद्यपदार्थ आपल्या समृद्ध सामाजिक आणि संस्कृतिक वारश्याचे प्रतिबिंब आहे. गोव्याच्या पारंपारिक अन्न संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी पर्यटन क्षेत्रात योग्य उपाययोजना आणि उपक्रमांवर भर देण्याची गरज आहे. ज्यामध्ये पारंपारिक पाककृतींना महत्त्व मिळेल असे ते म्हणाले.

प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या शुभदा सावईकर यांनी आपल्या प्रमुख भाषणात खेडेकर यांनी गोव्यात शतकानुशतके प्रचलित असलेल्या पारंपारिक खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करून हे पुस्तक लिहील्याचे सांगून युवा पिढीने हे पुस्तक वाचण्याचे आणि गोव्याची समृध्द अन्न संस्कृती, कृषी पद्धत आणि पाकशास्त्राचे महत्व जाणून घेण्याचे आवाहन केले.

माहिती खात्याचे माहिती अधिकारी किरण मुनानकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महाय्यक माहिती अधिकारी श्याम गांवकर यावेळी उपस्थित होते.

सिध्दी उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विनायक खेडेकर यांनी आभार मानले.