Connect with us

गोवा खबर

दिवसा कमी वीज वापरा, बिलात २०% सवलत; सायंकाळी जादा वापरावर २०% दंड

Published

on

Spread the love
  • वीजमंत्री सुदिन ढवळीकर ; डिसेंबरपासून स्मार्ट मीटर कार्यान्वित होणार

गोवा खबर : राज्यातील वीज वापर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. डिसेंबरपासून सर्व घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवले जाणार असून, सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत कमी वीज वापरणाऱ्यांना बिलात २०% सवलत मिळेल. मात्र, सायंकाळी ५ नंतर विजेचा अतिरेकी वापर केल्यास २०% अधिक आकारणी होईल, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, रात्री विनाकारण दिवे लावून ठेवणारे किंवा वीज वाया घालवणाऱ्यांना आता अधिक बिल भरावे लागेल. गरजेपुरतीच वीज वापरल्यास कोणताही भुर्दंड पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वीज दरवाढीवर काँग्रेसने तीव्र टीका केली आहे. प्रदेश काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर म्हणाले की, सायंकाळी ५ ते सकाळी ९ या वेळेत २०% जादा बिल आकारणी हा जनतेवरील अन्याय आहे. आधीच महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त असलेल्या नागरिकांवर हा आणखी प्रहार आहे.” सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली.