- ‘माझे घर योजना’ अर्ज वितरणाला मुख्यमंत्री सावंत यांची सुरुवात
गोवा खबर : राज्य सरकारने प्रत्येक नागरिकाला घराचा मालकी हक्क देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, या योजनेच्या अर्ज वितरणाची सुरुवात मये गावातून करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.
मुख्यमंत्री म्हणाले की, “ही योजना क्रांतिकारक असून प्रत्येक कुटुंबात आनंद आणि तणावमुक्त वातावरण निर्माण करेल.” त्यांनी अधिकाऱ्यांना सहा महिन्यांच्या मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
खासदार सदानंद शेट तानावडे यांनी या योजनेला “राज्यातील खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवणारी क्रांती” असे संबोधले, तर आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले की, “वर्षानुवर्षे मयेवासीयांनी भोगलेल्या असुरक्षिततेला आता पूर्णविराम मिळणार आहे.”
‘माझे घर योजना’मुळे गोमंतकीयांना स्थैर्य आणि मानसिक शांती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.