गोवा खबर : दोन वर्षांपेक्षा अधिक काळ ओलिस ठेवलेल्या सर्वांच्या मुक्ततेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. ओलिसांची मुक्तता ही त्यांच्या कुटुंबियांचे धैर्य, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेसाठी केलेले प्रयत्न आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा निर्धार याचा परिपाक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
गाझा भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या अध्यक्ष ट्रम्प यांच्या कळकळीच्या प्रयत्नांना मोदी यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
‘एक्स’ माध्यमावरील संदेशात मोदी म्हणतात, दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ओलिस राहिलेल्या सर्वांच्या सुटकेचे आम्ही स्वागत करतो. त्यांचे स्वातंत्र्य म्हणजे त्यांच्या कुटुंबियांचे धैर्य, अध्यक्ष ट्रम्प यांनी शांततेसाठी निर्धारपूर्वक केलेले प्रयत्न आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा दृढ निर्धार यांचा परिपाक आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या अध्यक्ष ट्रम्प यांच्या या प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे.