Connect with us

गोवा खबर

‘दूधसागर’साठी तात्पुरता तोडगा : ऑफलाइन नोंदणीला परवानगी

Published

on

Spread the love
  • जीप टूर ऑपरेटर असोसिएशनच्या भूमिकेनंतर जीटीडीसी आणि वन विभागाचा निर्णय

गोवा खबर : प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावरील पर्यटन व्यवस्थापनासंबंधी निर्माण झालेल्या तणावानंतर अखेर जीटीडीसी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरता तोडगा काढला आहे. आता पर्यटकांची नोंदणी पुन्हा ऑफलाइन पद्धतीने केली जाणार आहे.

दूधसागर जीप टूर ऑपरेटर असोसिएशनने सरकारकडे मागणी केली होती की, त्यांच्या बुकिंगसाठी असलेली वेबसाईट त्यांना परत द्यावी. तोपर्यंत ऑनलाइन पद्धतीने हंगाम सुरू करू नये, असा त्यांचा इशारा होता. शुक्रवारी असोसिएशनच्या सदस्यांनी आंदोलन छेडल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

दीर्घ चर्चेनंतर अखेर पर्यटकांसाठी गेट खुली करण्यात आली आणि ऑफलाइन बुकिंग सुरू करण्यात आले.

असोसिएशनचे अध्यक्ष निलेश वेळीप आणि सरपंच विनायक गावस यांनी सांगितले, “सरकारने आम्हाला तात्पुरता दिलासा दिला आहे. आम्हाला आमची वेबसाईट परत देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि विनय तेंडुलकर यांनी या प्रकरणात मदत केली याबद्दल आम्ही आभारी आहोत.”

तात्पुरत्या निर्णयामुळे पर्यटकांना धबधब्यावर जाण्याची परवानगी मिळाली असून, पुढील निर्णय होईपर्यंत हीच पद्धत सुरू राहणार आहे.