Connect with us

गोवा खबर

इंडिया बीच फॅशन वीक २०२५ – सीझन ११

Published

on

Spread the love

गोवा खबर : इंडिया बीच फॅशन वीक (आयबीएफडब्ल्यु) 2025, टाइमेक्स यांच्या प्रस्तुततेखाली, आपल्या ११व्या आवृत्ती (सीझन ११) गोव्यात पुन्हा येत आहे. हा प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट ९ ते ११ ऑक्टोबर २०२५ दरम्यान हिल्टन गोवा रिसॉर्ट येथे पार पडणार आहे. या तीन दिवसांच्या फॅशन उत्सवामुळे गोवा फक्त बीच पर्यटनापुरता मर्यादित न राहता लाइफस्टाइल टुरिझम, रिटेल अनुभव आणि डिझाइन नवोन्मेषाचे केंद्र बनणार आहे.

आयबीएफडब्ल्यु हा असा एक मंच आहे जिथे कल्पकता, व्यवसाय आणि संस्कृती एकत्र येतात, आणि त्यामुळे गोवा एक “बीच डेस्टिनेशनपेक्षा अधिक” म्हणून ओळख मिळवत आहे.

पल्लव ओझा, आयबीएफडब्ल्यु शोकेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक, हे गोव्याच्या अस्नोडा गावाचे रहीवासी. स्थानिक पातळीवरील त्यांच्या ह्या स्वप्नाचे आज आशियातील सर्वात मोठ्या रिसॉर्ट फॅशन प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरण झाले आहे.

ते म्हणाले, “अस्नोड्यात लहानाचे मोठे होतोना मला कधी वाटले नव्हते की एक दिवस आपण आपली सर्जनशीलता, डिझाइन आणि संस्कृती जागतिक मंचावर नेऊ शकू. आपल्या गोव्याच्या प्रतिभेत आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा करण्याचे बळ आहे ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आयबीएफडब्ल्यु आणि कोमो डिझायनर्स कलॅक्टीव्ह. आम्ही रनवे आणि रिटेल यांच्यामध्ये दुवा तयार करत आहोत, नवोदित डिझाइनर्सना संधी देत आहोत आणि गोव्याला लाइफस्टाइल आणि रिटेल पर्यटनाचे केंद्र बनवत आहोत”.

कोमो डिझायनर्स कलॅक्टीव्हच्या माध्यमातून पल्लव ओझा यांनी १०० पेक्षा जास्त डिझाइनर्सना एकत्र आणले आहे, ज्यात रिसॉर्ट, प्रसंगोपात आणि लाइफस्टाइल फॅशनचा समावेश आहे. यामुळे क्रिएटिव्हिटी आणि कॉमर्स यांच्यातील दुवा मजबूत होत आहे आणि गोवा एक जागतिक दर्जाचे लाइफस्टाइल हब म्हणून ओळख मिळवत आहे.

आयबीएफडब्ल्यु २०२५ ची थीम, “व्हेर रिसॉर्ट मिट्स बोल्ड इन्होवेशन” म्हणजेच जिथे रिसॉर्ट फॅशनचा धाडसी नवोन्मेषाशी संगम होतो, ही थीम शाश्वतता, हस्तकला आणि डिजिटल युगातील स्टोरीटेलिंग यावर आधारित आहे. हिल्टन गोवा रिसॉर्ट येथे होणाऱ्या प्रत्येक फॅशन शोकेस, इंस्टॉलेशन आणि कोलॅबोरेशनमध्ये भविष्योन्मुख विचार, सर्क्युलर डिझाइन आणि आकर्षक अनुभव यांचा सुंदर मेळ दिसून येईल.