गोवा खबर : गोवा रग्बी 7s 2025 – सीझन 2 या स्पर्धेमुळे गोवा क्रीडा पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून आपली ओळख अधिक मजबूत करत आहे. ही स्पर्धा 15 ते 16 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोमॅको अॅथलेटिक स्टेडियम, बांबोळी येथे पार पडणार आहे.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, भारताचे अग्रगण्य स्पोर्ट्स टुरिझम हब म्हणून गोवा स्थिरपणे पुढे जात आहे. गोवा रग्बी 7s 2025 सारख्या स्पर्धांना आम्ही देत असलेला पाठिंबा हा समुद्रकिनारे आणि नाईटलाइफ पलीकडील गोव्याच्या वेगवेगळ्या पर्यटन ऑफरिंग्ज देण्याच्या आमच्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे. अशा हाय एनर्जी कार्यक्रमांमुळे आपण युवकांना संधी देतो, स्थानिक समाजाला बळकटी देतो आणि खेळ व पर्यटन प्रेमींसाठी गोव्याला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून सादर करतो.

पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, क्रीडा आणि पर्यटन एकत्रितपणे विकसित करणारी परिसंस्था तयार करणे हेच पर्यटन विभागाचे ध्येय आहे . गोवा रग्बी 7s सारखे कार्यक्रम केवळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनदर्शिकेवर गोव्याचे स्थान उंचावत नाहीत, तर स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन, व्यवसायांना पाठबळ आणि पर्यटकांना शाश्वत अनुभव देण्याच काम करतात व आमच्या पुनरुत्थानशील पर्यटन दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत.
क्रोकोटायकल्स रग्बी फाऊंडेशन सोबतची ही भागीदारी गोव्याची पर्यटन ऑफरिंग्ज समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे नेण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. भारतात झपाट्याने लोकप्रिय होत असलेला रग्बी खेळ गोव्यातही गती घेत आहे आणि स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवण्याचे व्यासपीठ देत आहे.
निसर्गरम्य ठिकाणे, जागतिक दर्जाची पाहुणचार सेवा आणि मजबूत पायाभूत सुविधा यामुळे गोवा आता मॅरॅथॉन, ट्रायथलॉन, वॉटर स्पोर्ट्स चॅम्पियनशिप, रग्बी अश्या विविध क्रीडा कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करत आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन पोर्टफोलिओचा विस्तार होत आहे आणि आर्थिक विकास व रोजगार निर्मितीच्या नव्या संधी उघडत आहेत.
गोवा रग्बी 7s स्पर्धेत भारतातील आणि परदेशातील संघ सहभागी होणार असून, यामुळे गोव्याची क्रीडा प्रेमींसाठी प्रमुख गंतव्यस्थान म्हणून ख्याती अधिक बळकट होणार आहे आणि राज्याचा “Goa Beyond Beaches” उपक्रमही दृढ होणार आहे.