Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून दसऱ्याच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गोव्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात डॉ. सावंत म्हणतात, दसऱ्याच्या शुभप्रसंगी तुमच्या सर्व चिंता दूर होवो आणि तुमचे जीवन आनंदाने, समृद्धीने आणि तुमच्या स्वप्नांच्या पूर्ततेने भरून जावो.”

दसरा हा सण देशभरात भक्ती आणि आनंदाने साजरा केला जातो. दसरा हा सण सद्गुणावर वाईट प्रवृत्तीवर मिळविलेल्या शाश्वत विजयाचे प्रतीक आहे. हा सण भगवान रामाने रावणावर तर देवी दुर्गा देवीने महिषासुरावर मिळविलेल्या विजयाचे प्रतिक आहे. जो आपल्याला सत्य, धैर्य आणि सद्गुणाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो.

 माँ दुर्गा आणि भगवान श्रीराम यांच्या आशीर्वादाने, आपण सर्वांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवावा अशी माझी इच्छा आहे. हा दसरा तुमच्या कुटुंबात प्रेम, आनंद आणि शांतता घेऊन येवो, असे त्यांनी व्यक्त केले. सद्गुणांनी वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याचा हा सण आहे. या सणातून आपण ज्ञान, नैतिकता आणि चांगुलपणाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा घेऊया.”

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ च्या दृष्टिकोनाशी सुसंगत राहून, डॉ. सावंत यांनी  आपण स्वयंपूर्ण गोवाचे उद्दीष्ट पूर्ण करून गोव्याला विकासाने उजळून टाकुया.”

आपण हा आनंदाचा सण एकता, उत्साह आणि नव्या आशेने साजरा करूया. दसरा सण हा प्रत्येकाच्या घरात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.