Connect with us

गोवा खबर

‘पर्पल फेस्ट 2025’साठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण

Published

on

Spread the love

गोवा खबर : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘पर्पल फेस्ट 2025’ या महोत्सवाची तयारी जोरात सुरू असून ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव होणार आहे. सामाजिक न्याय मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यासाठी सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

या महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ‘पर्पल फेस्ट’ हा महोत्सव संस्कृती, समावेश आणि ऐक्य यांचा संदेश देणार असून दिव्यांग कलाकार आणि सहभागी यांना प्रोत्साहन देणे हा याचा केंद्रबिंदू आहे.

फळदेसाई म्हणाले, हा महोत्सव राज्याची प्रतिमा जागतिक स्तरावर उजळवेल. आवश्यक सुविधा, निवास, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सुरक्षा याची तयारी काटेकोरपणे केली जाईल.