गोवा खबर : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (RIL) 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) चेअरमन मुकेश अंबानी यांनी ‘इंडियन ड्रीम’ मांडत समृद्धी आणि करुणेने नेतृत्व करणारा भारत घडविण्याचा संकल्प व्यक्त केला. भारताची अर्थव्यवस्था आगामी दोन दशकांत 10% वार्षिक वाढीसह 4 ते 5 पट वेगाने प्रगती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिओचा विक्रम आणि IPO योजना
जिओने 50 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला असून पुढील आठवड्यात डिजिटल सेवेत 10 वर्षे पूर्ण होणार आहेत.
2025 आर्थिक वर्षात जिओचे उत्पन्न ₹1,28,218 कोटी, तर ईबीआयटीडीए ₹64,170 कोटी नोंदले गेले – 17% वाढीसह.
कंपनीने जिओ IPO ची घोषणा केली असून 2026 च्या पहिल्या सहामाहीत लिस्टिंगचे लक्ष्य ठेवले आहे.

महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवा पर्यटन खात्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवा सरकारकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवा प्रदेश भाजप कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

मगो पक्षाकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आप गोवा समन्व्यक अमित पालेकर यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

कळंगुट आमदार मायकल लोबो आणि शिवोली आमदार दिलायला लोबो यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

माजी आमदार प्रविण झांट्ये यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवसेना उबाठा गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
डिजिटल आणि AI उपक्रम
जिओकडून जागतिक दर्जाच्या AI-आधारित सेवांची घोषणा करण्यात आली.
डिजिटल ट्विन सिस्टीम, जिओ AI क्लाउड, जिओ पीसी, जिओ फ्रेम्स या नवीन सेवा सुरू होणार आहेत.
‘RIYA’ नावाचा व्हॉइस-एनेबल्ड AI असिस्टंट, ‘जिओलेन्झ’ आणि क्रिकेटसाठी ‘Maxview 3.0’ सारख्या नवनवीन सुविधा जिओहॉटस्टार प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत.
गुगल आणि मेटा सोबत भागीदारीत AI उपक्रम हाती घेण्यात आले असून Reliance Intelligence नावाने स्वतंत्र AI उपकंपनीची घोषणा झाली.
मानवाकृती रोबोटिक्स क्षेत्रातही रिलायन्स प्रवेश करणार आहे.
रिटेल आणि ग्राहक बाजार
रिलायन्स रिटेल पुढील काळात 20% पेक्षा जास्त CAGR दराने वाढविण्याचे लक्ष्य ठेवत आहे.
RCPL थेट RIL ची उपकंपनी बनेल आणि भारताच्या $2 ट्रिलियन ग्राहक बाजारपेठेत आघाडी घेण्याची तयारी आहे.
ऊर्जा आणि टिकाऊपणा
गुजरातच्या जामनगर येथे उभारला जात असलेला धीरुभाई अंबानी गिगा एनर्जी कॉम्प्लेक्स हा टेस्लाच्या गिगाफॅक्टरीपेक्षा तब्बल चारपट मोठा असणार आहे.
44 लाख चौरसफूट क्षेत्रावर उभारला जाणारा हा कॉम्प्लेक्स जगातील सर्वात मोठा पारंपरिक आणि नवा ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे.
कच्छ येथे 5,50,000 एकर जागेवर सौर प्रकल्प उभारण्यात येत असून तो सिंगापूरच्या आकारापेक्षा तिप्पट मोठा असेल. हा प्रकल्प भारताच्या एकूण वीजेच्या 10% गरज भागवेल.
बॅटरी गिगा-फॅक्टरी 2026 मध्ये सुरू होणार असून तिची क्षमता 40 GW प्रतिवर्ष असेल; पुढे ती 100 GW पर्यंत वाढवली जाईल.
इलेक्ट्रोलायझर गिगा-फॅक्टरी देखील 2026 च्या अखेरीस सुरू होईल.
आरोग्य आणि सामाजिक उपक्रम
मुंबईतील H.N. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ‘जीवन’ विंग सुरू होणार असून केमोथेरपी आणि इम्युनोथेरपीसाठी हे अत्याधुनिक केंद्र उपलब्ध होईल.
मुंबईत 2,000 खाटांचे ‘मेडिकल सिटी’ प्रकल्प उभारला जाणार आहे.
नीता अंबानी यांनी मुंबई कोस्टल रोडवरील ‘गार्डन्स प्रकल्पा’ची घोषणा केली.
जागतिक भागीदारी
वॉल्ट डिस्नेचे CEO बॉब आयगर यांनी AGM दरम्यान भारत हा डिस्ने साठी सर्वात महत्त्वाचा व रोमांचक बाजार असल्याचे सांगितले.
मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि संदेश
मुकेश अंबानी यांनी भारताने स्वदेशी मॉडेलवर आधारित विकास साधावा, आत्मनिर्भर व्हावे यावर भर दिला. “संघर्षात कुणी जिंकत नाही, सहकार्याने सर्वांचे हित साधते,” असा संदेश देत जागतिक सहकार्यालाच टिकाऊ प्रगतीचे सूत्र मानले.