Connect with us

गोवा खबर

टॅक्सी प्रश्नावर राज्य धोरण आवश्यक : मायकल लोबो

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील टॅक्सी प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःचे धोरण तयार करणे आवश्यक असल्याचे मत कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत टॅक्सीमालक डिजिटल प्लॅटफॉर्मवर यायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. लोबो म्हणाले,  सध्या आपण केंद्र सरकारचे धोरण पाळत आहोत. पण राज्य धोरण अस्तित्वात आल्यावर भाडे निश्चित होईल. प्रवाशांकडून फक्त अधिसूचित दरांनुसारच पैसे घेता येतील.

त्यांनी मडकई गोळीबार प्रकरणाचा उल्लेख करत, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दोन वर्षांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली.