Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांमुळेच घराची सुरक्षा : विश्वजित राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी गणेश चतुर्थी निमित्त आयोजित कार्यक्रमात सत्तरीच्या विकासात प्रतापसिंग राणे यांचे योगदान अधोरेखित केले.

ते म्हणाले, आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अल्वारा, महसुली व सरकारी जमिनीवरील घरांना कायदेशीर मान्यता देणारे नवे कायदे केले आहेत. त्यामुळे लोकांना घराचा कायदेशीर अधिकार मिळाला.

या कार्यक्रमात हजारो लोकांना गणेशोत्सवाचे साहित्य वाटप करण्यात आले. लोकांनी अपप्रचाराला बळी न पडता विकासाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच सत्तरीतील पाणीपुरवठ्याची समस्या लवकरच सोडवली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.