Connect with us

गोवा खबर

‘माझे घर’ योजनेसाठी सप्टेंबरपासून अर्ज उपलब्ध

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्य सरकारने ‘माझे घर’ योजनेअंतर्गत १९७२ पूर्वीची घरे कायदेशीर करण्याची प्रक्रिया सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाळी-कोळंबी पंचायतीच्या नूतन इमारतीच्या पायाभरणी सोहळ्यात ही माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकांनी आपल्या कागदपत्रांची तयारी करून ठेवावी. वादविवाद किंवा न्यायालयीन प्रक्रिया न करता गाव पातळीवर सामोपचाराने प्रश्न सोडवावेत. या योजनेमुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

त्याचबरोबर, नीट व जेईई परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सरकार विशेष मार्गदर्शन सेल सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.