Connect with us

गोवा खबर

गोव्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाच्या फिरत्या पारपत्र सेवा व्हॅनचे 12 ऑगस्ट रोजी वास्को येथे होणार उद्घाटन

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर:मोबाइल पासपोर्ट सेवा अर्थात फिरते पारपत्र सेवा वाहनाचे उद्घाटन 12 ऑगस्ट 2025 रोजी वास्को शहरातील वास्को नगरपालिका कार्यालयात होणार असून या सेवेचे औपचारीक उद्घाटन एनआरआय आयुक्त नरेंद्र के. सवाईकर यांच्या हस्ते सकाळी 11:00 वाजता होणार आहे.

नागरिक सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या गोव्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने जून 2025 मध्ये ही फिरती पारपत्र व्हॅन सुरू केली आहे. नागरिकांना पारपत्र सेवा सहज उपलब्ध करून देणे या उद्देशाने हे फिरते पारपत्र वाहन सुरू करण्यात आले आहे.

अर्जदार www.passportindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर मोबाइल पासपोर्ट सेवा व्हॅनमध्ये (आरपीओ गोवा वास्को द गामा मोबाईल व्हॅन MH12VT9706) 12 ऑगस्ट रोजी सेवा मिळवण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करू शकतात. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या वेळेनुसार हजर राहणे आवश्यक आहे.

अर्जदार अधिक माहितीसाठी, गोव्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाशी 0832-2437602 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा rpo.panaji@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

हे वाहन अर्ज सादर करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि बायोमेट्रिक डेटा संकलन यासारख्या महत्त्वाच्या सेवा पुरवण्यासाठी सुसज्ज आहे.