गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये पणजी शहरात पणजी मनपा तर्फे राबवण्यात येतं असलेल्या स्वच्छता अभियानाची दखल घेत कौतुकाची थाप मारली. पणजी मनपा मध्ये महापौर रोहित मोन्सेरात यांनी उप महापौर संजीव नाईक, नगरसेवक प्रमेय माईणकर, किशोर शास्त्री,आयुक्त यांच्या सोबत पणजी मनपाच्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यां सोबत आपल्या दालना मध्ये मन की बातचा आजचा भाग पाहिला.
कार्यक्रम संपल्या नंतर दूरदर्शन सोबत बोलताना महापौर म्हणले, पंतप्रधान मोदी यांनी पणजी मनपाच्या करायची दखल घेतली ते पाहून खूप बरे वाटले. सहकारी नगरसेवक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानातून हे शक्य झाले. यापुढे देखील असेच काम करत राहू.
नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी मन की बातचा भाग पहिल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या दखली बद्दल आनंद व्यक्त करत पणजी मनपा महापौर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनती मुळे हे शक्य झाल्याचे सांगितले.