Connect with us

गोवा खबर

भाजपच्या ओठांवर मध, हृदयात संविधान हत्या : विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

Published

on

Spread the love

गोवा खबर : भाजप सरकारच्या ओठावर साखर आणि मधाची आश्वासने आहेत, पण छुपा अजेंडा संविधानावर हल्ला करणे, विरोधकांचा आवाज दाबणे आणि लोकशाही प्रक्रियेला कमकुवत करणे हा आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हटले.

कायदा व सुव्यवस्था ढासळणे, जमिनीचे रुपांतरण, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, बेरोजगारी, अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटनांसह अनेक समस्यांनी गोवा त्रस्त आहे. तरीही हे सरकार ‘सुसेगाद’ असल्याचे दिसते. भाजप सरकार जनतेला गृहीत धरत आहे, पण आम्ही विरोधकांचा आवाज दाबू देणार नाही आणि लोकशाही प्रक्रियेला कमकुवत करू देणार नाही, असे काँग्रेस नेते आलेमाव यांनी म्हटले आहे.

आलेमाव यांनी म्हटले की भाजप, राज्याच्या अस्तित्वाला कमी लेखण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यामुळे गोव्याच्या भविष्याला धोका निर्माण होणार.

भाजपच्या ओठांवर साखर आणि मधाची वचने आहेत, पण त्यांच्या जिभेवर खोटं बोलण आणि गोव्याच्या जमिनीवर डोळे आहेत, तसेच ‘संविधान हत्त्या’ त्यांच्या हृदयात आहे, असे युरी आलेमाव यांनी भाजपचे वर्णन करतना म्हटले.

राज्याचा मुख्यमंत्री ’मोठा’ आहे, पण अत्यंत दुर्बल सरकार आणि कमकुवत व्यवस्थापन आहे. स्वयंपाकघरात अनेक स्वयंपाकी असल्यावर गोंधळ निर्माण होतो, तसाच गोंधळ सत्ताधारी पक्षात दिसत आहे. मुख्य शेफकडे ६०% पेक्षा अधिक खाती आहेत, पण लोकांना सेवा मिळत नाही. परिणामी, राज्यातील लोकांना त्रास सहन करावा लागतो, असे आलेमाव म्हणाले.

अधिवेशनाचे दिवस कमी केल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आणि असे केल्याने लोकांचा आवाज उठवण्यास विरोधकांना संधी मिळत नसल्याचे ते म्हणाले.

तथापि, आम्ही सरकारच्या अपयशांना उत्तरदायीत्व धरण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू, आणि आम्ही अपेक्षा करतो की सभापती सभागृहाचे नियम पाळून सर्वांना न्याय देईल, असे त्यांनी म्हटले.