Connect with us

गोवा खबर

गोवा देशात पहिलं ‘टँडेम मास स्पेक्ट्रोमेट्री’ वापरणारं राज्य

Published

on

Spread the love

गोवा खबर : नवजात बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी गोवा हे ‘टँडेम मास स्पेक्ट्रोमेट्री’ तंत्रज्ञान वापरणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. या अत्याधुनिक तपासणीमुळे ५० पेक्षा अधिक मेटाबॉलिक व जनुकीय आजारांचे लवकर निदान होणार असून वेळेवर उपचार शक्य होणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

या उपक्रमामुळे नवजात बालकांच्या दीर्घकालीन आरोग्यावर सकारात्मक परिणाम होणार आहेत. जन्मतः असलेले अनेक आजार ओळखून वेळेत उपचार केल्यास मोठे धोके टाळता येतील.

राज्यातील प्रत्येक बाळाला चांगल्या आरोग्याची सुरुवात मिळावी, यासाठी ही आरोग्य चाचणी सुरु करण्यात आली असून, गोव्याने देशपातळीवर आदर्श निर्माण केला आहे, असेही राणे म्हणाले.