Connect with us

गोवा खबर

गोमंतकीयांना फॉर्मेलिनमुक्त मासळीची खात्री

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यात पावसाळ्यात मासेमारी बंद असली तरी बाजारात येणाऱ्या बाह्य राज्यातील मासळीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कडक नजर ठेवली आहे. मार्च ते जून २०२५ या चार महिन्यांत २ लाखांहून अधिक मासळीचे नमुने तपासले गेले असून, बहुतेक नमुने फॉर्मेलिनमुक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या सूचनेनुसार ही तपासणी सुरु असून पोळे, पत्रादेवी आणि मडगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नमुने तपासण्यात आले. अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे – जसे की GC-MS, LC-MS – दूषित रसायनांची अचूक चाचणी केली जात आहे.

“जनतेला सुरक्षित अन्न मिळणे ही आमची प्राथमिकता आहे,” असं मंत्री राणे यांनी स्पष्ट केलं आहे. मासळीची गुणवत्ता आणि ताजेपणा सुनिश्चित करण्यासाठी चोख व्यवस्था उभी करण्यात आली आहे.