गोवा खबर : स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम हा सरकारचा एक प्रमुख कार्यक्रम आहे, जो वंचित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांद्वारे लोकप्रिय होत आहे. मानवी विकासाच्या सर्व पैलूंमध्ये राज्याला स्वयंपूर्ण बनविण्याचे उद्दिष्ट आहे. गोवा सरकार या उपक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांद्वारे गोव्यातील अर्ध्या लोकसंख्येशी यशस्वीरित्या जोडला गेला आहे.
मानवी विकास सुनिश्चित करण्याच्या प्राथमिक उद्दिष्टासह, विविध सरकारी लाभार्थी-केंद्रित योजना आणि सेवा प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत.
१ जानेवारी २०२५ पासून राज्यातील १४ हून अधिक खात्यांनी ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये मोहिमा राबविल्या आहेत. या मोहिमा जागरूकता पसरविण्यासाठी आणि ४० हून अधिक सरकारी योजनांशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित केल्या जात आहेत.
हे अभियान ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये सुरूच राहतील आणि स्थानिक ग्रामपंचायती, नगरपालिकांमध्ये मिळणाऱ्या सेवांचा पुरेपूर लाभ घ्यावा अशी विनंती सर्वसामान्यांना करण्यात येत आहे.

३० जून २०२५ पर्यंतचे तात्पुरते वेळापत्रक २७ जून २०२५ रोजी अडवलपाल आणि मये वायंगिणी, डिचोली, दुर्भाट, फोंडा येथे, भाटी, सांगे येथे, सेंट कॉर्पोरेशन आणि गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाद्वारे, सेरावली सासष्टी येथे, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाद्वारे, उगे सांगे येथे, समाज कल्याण आणि अनुसूचित जाती आणि ओबीसी महामंडळाद्वारे आणि खोर्ली, तिसवाडी येथे डब्ल्यूआरडीद्वारे.
२८ जून २०२५ रोजी रेईस-मागोस, बार्देश, आमोणा, डिचोली, मडकई फोंडा येथे पशूसंवर्धन आणि वाहतूक खात्यातर्फे, बाळ्ळी- अडणे, केपे, सेरावली सासष्टी येथे पशुसंवर्धन खात्यातर्फे, रेवोडा, बार्देश, शिरगाव, डिचोली, मोले धारबांदोडा, कोरगांव, पेडणे, उसगांव, फोंडा, नेतुर्ली, सांगे, नगरगांव, सत्तरी, शिरदोण- पाळे, तिसवाडी येथे मत्स्योध्योग खात्यातर्फे.
२८ जून २०२५ रोजी साल्वादोर द मुंद, बार्देश, साळे डिचोली कांसावली, मुरगांव, शिरोडा, फोंडा, असोल्णा आणि नाक्केरी- बेतुल, केपे, गिरदोली, सासष्टी, भिरोंडा, सत्तरी येथे जलस्त्रोत खात्याद्वारे. सिरसई, बार्देश, पिळगाव, डिचोली, कुठ्ठाळी, मुरमगांव, वेरे-वाघुर्मे, फोंडा, आंबावली, केपे, काना-बाणावली, सासष्टी आणि ताळगाव, तिसवाडी येथे समाजकल्याण खात्यातर्फे, वन-मावळिंगे-कुडचिरे, डिचोली, मुरगाव वार्ड ११ ते १५, वारखंड नागझर, पेडणे आणि भोमा- अडकोण, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे आणि ओबीसी कॉर्पोरेशनद्वारे वेळगे, डिचोली, वेळसांव, पाले इस्सॉरसी, मुरगाव, नुवे, सासष्टी आणि खोर्ली, तिसवाडी येथे. श्रीस्थळ, काणकोण चिकोल्णा बोगमाळो, मुरगांव येथे एसटी महामंडळ आणि मत्स्योध्योग खात्याकडून. किर्लपाल-दाबाळ, धारबांदोडा येथे समाज कल्याण आणि वाहतूक खात्याकडून. वेर्णा, मुरगांव येथे अल्पसंख्याक महामंडळाकडून. फोंडा नगरपालिका वॉर्ड १ ते १५, फोंडा, कुर्डी, सांगे आणि गुळेली, सत्तरी येथे एसटी महामंडळाकडून. काले, सांगे येथे समाज कल्याण आणि एससी आणि ओबीसी महामंडळाकडून. वाळपई नगरपालिका वॉर्ड १ ते १०, सात्तरी आणि सांतइस्तेव्ह, तिसवाडी येथे पशुसंवर्धन आणि गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून आयोजित करण्यात आले आहे..