गोवा खबर : गोव्यामध्ये वय वर्षे ११ वा त्याहून अधिक वयाच्या दिव्यांग व्यक्तींना सुनियोजित, अर्थपूर्ण इंटर्नशिप संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाद्वारे, सेंट रेजिस गोवा रिसॉर्ट आणि समावेशकता सल्लागार एल्रिन फर्नांडिस यांच्या सहकार्याने, दिव्यंगत्व-समावेशक इंटर्नशिप कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला आहे.
या इंटर्नशिप उपक्रमाच्या समारोप समारंभावेळी राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक; संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनचे मुख्याध्यापक तातू कुडाळकर; सेंट रेजिस गोवा रिसॉर्टचे महाव्यवस्थापक सतीश कुमार; सेंट रेजिस गोवा रिसॉर्टच्या मानव संसाधन व्यवस्थापक डोरिन मस्कारेन्हास; सेंट रेजिस गोवा रिसॉर्टचे हॉटेल व्यवस्थापक अमित मल्होत्रा आणि समावेशकता सल्लागार एल्रिन फर्नांडिस यांची प्रमुख उपस्थिती होती.
लहान वयातच विकासात्मक हस्तक्षेप (अर्ली इंटनव्हेन्शन) करण्याच्या उद्देशाने संजय सेंटर आणि स्थानिक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने पदवी शिक्षण पूर्ण होण्या आधीच १८ महिने योग्य दिव्यांग विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. ३० तासांहून अधिक आवश्यक अशा कृतियुक्त कार्यशाळा, सराव मुलाखती, प्रत्यक्ष व्यावसायिक प्रशिक्षण अशा विविध कौशल्यविकास साधनांच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने वावरता यावे यासाठी सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.

सेंट रेजिस गोवा रिसॉर्ट येथे पहिल्या दिव्यंगत्व-समावेशक इंटर्नशिप उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत बोलताना राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक म्हणाले,हा उपक्रम दिव्यांगजनांचे अधिक कायद्यातील दृष्टिकोनाशी सुसंगत असून, सतत लोकहित ठेवून हॉस्पिटॅलिटी उद्योगक्षेत्रात कार्यरत नेत्वाद्वारे सन्मानजन रोजगारसंधी कशा प्रकारे उपलब्ध करून देणे शक्य असल्याचाआदर्श या उपक्रमातून घालून देण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या परिणामकारकतेबाबत बोलताना, द सेंट रेजिस गोवा रिसॉर्टचे महाव्यवस्थापक सतीश कुमार म्हणाले, सर्वांकडून प्रशंसा होणारे रिसॉर्ट म्हणून आमच्या रिसॉर्टची ओळख आहे. त्यामुळे सर्वसमावेशकतेकडे आम्ही संस्थात्मक धोरणाचा भाग या पलीकडे एक आदर्श सामाजिक पद्धती म्हणून पाहतो. एखाद्या पाहुण्याचे स्वागत करणे असो किंवा एखाद्या शिकावू कर्मचाऱ्याची निवड करणे असो, प्रत्येक कामामध्ये, सेवेमध्ये आमचा एकच दृष्टिकोन आहे: प्रत्येकाचा आदर करणे, सन्मान करणे आणि प्रत्येकाला योग्य संधी देणे. जेव्हा आदरातिथ्य समावेशक असते तेव्हा सर्वांनाच लाभ मिळत राहतो, या आमच्या धारणेला या उपक्रमाच्या माध्यमातून बळकटी मिळाली आहे.
समावेशकता आपल्या कुटुंबापासून, घरापासून सुरू होते. त्यामुळे विविध अभ्यास दौरे, संवादसत्रे आणि सहभागात्मक मुलाखतींच्या माध्यमातून, ५० हून अधिक कुटुंबांना सक्रियपणे या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले, त्यांची भीती दूर करत विश्वास निर्माण करण्यात आला. एचआर व्यवस्थापिका डोरिन मस्कारेन्हास यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या या पायाभूत प्रयत्नांमुळे या उपक्रमात पालकांचा सहभाग वाढला आणि हाच सहभाग या उपक्रमाच्या यशाचा कणा बनला. त्याचबरोबर रिसॉर्टच्या सर्व कर्मचाऱ्यांनाही विविध मनोरंजनात्मक उपक्रम आणि परिस्थिती-आधारित शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले गेले व यातून दिव्यंगत्वाबाबत जाणिव निर्मिती कऱण्यात आली आणि प्रत्येक स्तरावर समावेशक कार्यस्थळ संस्कृती घडविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
या उपक्रमाद्वारे सेंट रेजिस गोवा रिसॉर्टने वैविध्यपूर्ण प्रतिभेचा विकास करण्याबरोबरच भारतामध्ये सर्वसमावेशक लक्झरी हॉस्पिटॅलिटी सेवेचा नवा मापदंड स्थापित केला आहे.