Connect with us

गोवा खबर

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे गोव्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रण

Published

on

Spread the love

गोवा खबर :  सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने फर्मागुडी, फोंडा येथील अभियांत्रिक महाविद्यालयाच्या पटांगणावर १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे गोव्यातील विविध लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात येत आहे.

महोत्सवाचे निमंत्रण शिरोडा मतदारसंघाचे आमदार तथा जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, थिवी मतदारसंघाचे आमदार तथा मत्सोद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर, वास्को मतदारसंघाचे आमदार दाजी साळकर आदींना देण्यात आले आहे. इतर मंत्रीगण आणि आमदार यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना महोत्सवाला निमंत्रित देण्यात येत आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी महोत्सवाला शुभसंदेशही पाठवले आहेत.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामुळे गोव्याचा ऐतिहासिक, समृद्ध आणि सांस्कृतिक वारसा जगासमोर येईल : रोहन खंवटे, पर्यटन मंत्री

गोवा सरकार आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सक्रिय आहे. सनातन धर्माला केंद्रस्थानी ठेवून आध्यात्मिक पर्यटनाला आणखीन चालना देण्याचा सुवर्णक्षण आज ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या आयोजनाच्या माध्यमातून आलेला८ आहे. या महोत्सवामुळे गोव्याचा ऐतिहासिक, समृद्ध आणि सांस्कृतिक वारसा जगासमोर येण्यास मदत होणार आहे, असा संदेश पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी पाठवला आहे.