गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पद्मश्री पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्त्या के.व्ही. रबिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
त्यांनी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये लिहिले: “पद्मश्री पुरस्कार प्राप्त के.व्ही. रबिया जी यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. साक्षरता सुधारणाविषयक त्यांचे अग्रगण्य कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांचे धैर्य आणि दृढनिश्चय, विशेषतः पोलिओशी त्यांनी दिलेला लढा खूप प्रेरणादायी होता. या दुःखद प्रसंगी त्यांच्या आप्तस्वकीयांप्रति माझ्या सहवेदना.”