गोवा खबर : दाबोळी येथील आयएनएस हंसाने २३ रोजी केळशी रेंज येथे लहान शस्त्रांचा गोळीबार प्रशिक्षण आयोजित केल्याची माहिती दिली आहे.
गोळीबार रेंज आसपासच्या लोकाना आणि मालमत्तेला कोणताही धोका नाही. रहिवाशांना गोळीबाराच्या आवाजाने न घाबरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तथापि, केळशी हे धोक्याच्या क्षेत्रात येत असल्याने रहिवाशांना त्याच्या शेजारील समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास मनाई आहे.
केळशी रेंजच्या २ किमी अंतरावर समुद्रात मासेमारी, नौका मनोरंजन नौकानाही प्रतिबंध आहे. त्यासाठी नागरिकांनी आणि नाविकांनी वरील काळात धोक्याच्या ठिकाणी प्रवेश करू नये असे आयएनएस हंसाच्या कमांडिंग अधिकाऱ्यांनी कळविले आहे.