Connect with us

गोवा खबर

म्हापश्यात मोठे क्रिकेट मैदान उभारण्यासाठी प्रयत्न करणार :केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

Published

on

Spread the love
गोवा खबर:क्रिकेट हा जगातील सर्वांत मोठा खेळ झालेला आहे, तसेच सर्वांनाच तो आवडतो. त्यामुळे या खेळातील गोव्याच्या खेळाडूंना पुढे नेण्याचे आम्हा सर्वांचे काम आहे. आम्हाला वाटतं की आमच्या गोव्याचे काही क्रिकेट खेळाडु भारताच्या क्रिकेट चमूत असावेत. परंतु जोपर्यंत असे टूरन्मेंट होत नाहीत, जोपर्यंत मोठे ग्राउंड खेळाडूंना मिळत नाहीत तोपर्यंत खेळाडू तयार होणे शक्य नसते. त्यासाठी येथे एक मोठे मैदान करून देण्यासाठी  मी सरकार दरबारी प्रयत्न करीन, असे आश्वासन
केंद्रीय राज्यमंत्री तथा गोव्याचे ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. श्रीपाद नाईक यांनी येथे दिले. यावेळी ते एस. के. जॉगिंग क्रिकेटर्सच्या सातव्या दिवस रात्र विद्युत झोतातील प्रतीयोगीतेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक व शिवानी डेव्हलपर्सचे मालक श्री. शिवशंकर मयेकर, माजी आमदार किरण कंदोळकर, माजी सरपंच प्रशांत नाईक, सिव्हिल सप्लायांचे सहाय्यक डिरेक्टर श्री. तुलसीदास दाबोलकर, काणका पंचायतीच्या सरपंचा सौ. आरती प्रवीण च्यारी, सौ. अवनी अमेय कोरगावकर, नगरसेवक तारक आरोलकर, अंजुना पंचायतीचे पंच श्री. सुबोध पार्सेकर, अंजुना पंचायतीचे पंच श्री. दिनेश पाटील, म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. प्रिया मिशाळ, यु. बी. बेवारीजच्या गोवा राज्य प्रमुख श्रीमती गीतांजली सिंग  राजपूत, माजी जिल्हा परिषद मेम्बर श्री. दीपक कलंगुटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अश्या लहान लहान प्रतियोगीतांमुळेच आम्ही गोव्याला पर्यायाने भारताला चांगले खेळाडू देऊ शकणार. खेळांच्या माध्यमातूनच एक नवीन आणि सशक्त पिढी निर्माण होते. गोव्यालासुध्दा जर राष्ट्रीय स्तरावर नाव कमावून द्यायचे असेल तर आम्हाला सुद्धा आमचा खारीचा वाटा उचलावा लागेल, असे ते शेवटी म्हणाले.
सुरुवातीला एस. के. जॉगिंग क्रिकेटर्सचे अध्यक्ष श्री. महेश कोरगावकर यांनी सर्वांचे स्वागत केले व स्वागतपर भाषण केले, तसेच त्यांनीच आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी सर्वश्री किरण कंडोळकर, दीपक कलंगुटकर, शिवशंकर मयेकर यांची समयोचित भाषणे झाली. सुरवातीला मान्यवरांना मैदानावर नेण्यात आले. तिथे प्रथम सामना खेळणाऱ्या दोनही संघांची ओळख करून देण्यात आली. प्रमुख पाहुणे श्री. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. राष्ट्रगीत गायन झाले व तिरंगी फुगे मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडूण्यात आले. तद्नंतर प्रतियोगीतेसाठी बनविण्यात आलेल्या खास लाकडी ट्रॉफीनचे मान्यवरांच्या हस्ते रीतसर प्रदर्शन करण्यात आले.