Connect with us

गोवा खबर

ड्रीम स्पोर्ट्स फुटबॉल नॅशनल्स : मोहन बागान व चेन्नैयिन एफसीची विजयी सुरुवात

Published

on

Spread the love

गोवा खबर : मोहन बागान सुपर जायंट्स (MBSG) आणि चेन्नैयिन एफसी यांनी ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिप फुटबॉल २०२५ राष्ट्रीय अंतिम फेरीतील आपले पहिले सामने जिंकून विजयी सुरुवात केली. हे सामने मंगळवारी सकाळी दक्षिण गोव्यात खेळवले गेले.

MBSG ने एसएजी बेनौलिम मैदानावर रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स (RFYC) संघावर ने विजय मिळवला, तर चेन्नैयिन एफसी ने स्थानिक संघ डेम्पो एससीला उतोर्डा मैदानावर असे पराभूत केले.

मोहन बागान संघाला ३९व्या मिनिटाला मोनू राजबंशीने गोल करून अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर थांगंगाईसांग हाओकिपने ९०व्या मिनिटाला आणखी एक गोल करत संघाचा विजय निश्चित केला.

इतर सामन्यात चेन्नैयिन एफसीने डेम्पो एससीवर वर्चस्व गाजवत असा विजय मिळवला. ४७व्या मिनिटाला मोहम्मद साहिर याने संघासाठी पहिले गोल केले, तर ८७व्या मिनिटाला अभिनाश सिंग यांनी आणखी एक गोल करत संघाचा विजय निश्चित केला. ही स्पर्धा १७ वर्षाखालील गटातील आहे.

मंगळवारी संध्याकाळी बेनौलिम मैदानावर पंजाब विरुद्ध सेसा फुटबॉल अकॅडमी आणि उतोर्डा मैदानावर नॉर्विच सिटी एफसी विरुद्ध फुटबॉल फॉर चेंज हे सामने होणार आहेत.

उद्याचे मुलींचे सामने:

एसएजी बेनौलिम मैदान: सकाळी :३० वाजताआसाम विरुद्ध कर्नाटक
संध्याकाळी :३० वाजताकेरळ विरुद्ध दिल्ली

उतोर्डा मैदान: सकाळी :३० वाजताझारखंड विरुद्ध गोवा
संध्याकाळी :३० वाजताराजस्थान विरुद्ध ओडिशा