Connect with us

गोवा खबर

जागतिक आरोग्य दिन साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर : आरोग्य सेवा संचालनालयाने जागतिक आरोग्य दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम पणजीतील मिनेझिस ब्रांगांझा संस्थेच्या मुख्य सभागृहात साजरा केला. आरोग्य मंत्री विश्वजित राणे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना ‘निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य’ अशी आहे, जी माता आणि नवजात शिशुंच्या आरोग्यावर वर्षभर चालणारी मोहीम आहे.

राणे यांनी आरोग्य सेवेतील उपलब्धता आणि दर्जा याबद्दल माहिती दिली. आरोग्य क्षेत्रात जलद आणि प्रभावी व्यवस्थापनावर त्यांनी भर दिला. जनतेला चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य खात्याने घेतलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

जागतिक आरोग्य दिन हा जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत दरवर्षी ७ एप्रिल रोजी साजरा केला जाणारा जागतिक आरोग्य जागरूकता दिन आहे.

गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. खेया मेलो फुर्तादो, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या होत्या. गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, अन्न व औषध प्रशासनाचे संचालक श्वेता देसाई, महिला व बाल विकास संचालनालयाचे संचालक मॅन्युएल बार्रेटो,  गोवा दंत महाविध्यालयाचे डीन डॉ. इडा डी नरोन्हा, नर्सिंग शिक्षण संस्थेचे प्राचार्य (डॉ) विल्सन एन. फर्नांडिस, आरोग्य सेवा संचालक डॉ. रूपा नाईक, राज्य कुटुंब कल्याण ब्युरोचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम देसाई आणि इतर उपस्थित होते.

याप्रसंगी. डॉ. खेया यांनी माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी समर्पित या वर्षीच्या संकल्पनेचे महत्त्व प्रतिपादले. त्यांनी माता आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारणे हे सध्याच्या समाजासाठीच नव्हे तर भावी पिढीसाठीही महत्त्वाचे आहे असे सांगितले.

डॉं बांदेकर यांचेही यावेळी भाषण झाले. सुरवातीस आरोग्य सेवा संचालक डॉ. रूपा नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. श्वेता काणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि  एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी आभार मानले.