Connect with us

गोवा खबर

ओशन फिल्म फेस्टिवल : एनएफडीसी देत आहे किनारपट्टी संवर्धनाला चालना

Published

on

Spread the love

गोवा खबर : इकोलफोक्स राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसीच्या) सहकार्याने ओशन फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2025 चे आयोजन केले असून किनारपट्टी संवर्धनाच्या मोहिमेला सिनेमाच्या सामर्थ्याची जोड देऊन उल्लेखनीय प्रभाव पाडण्यासाठी सज्ज झाले आहे. 6 एप्रिल रोजी वीरमाता जिजाबाई भोसले बोटॅनिकल उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (मुंबई प्राणीसंग्रहालय) येथे होणाऱ्या या महोत्सवाचा उद्देश सागरी परिसंस्थांबद्दल जागरूकता निर्माण करणे, महासागर -केंद्रित कथा प्रदर्शित करणे आणि भारताच्या समृद्ध सागरी वारशाची ओळख करून देणे हा आहे.

या वर्षीच्या महोत्सवाच्या केंद्रस्थानी एनएफडीसीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, जी सामाजिक आणि पर्यावरणीय बदल घडवून आणणाऱ्या प्रभावी चित्रपटांना प्रोत्साहन देण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर भर देते. अर्थपूर्ण चित्रपटांना चालना देण्यासाठी समर्पित भारतातील एक प्रमुख संस्था म्हणून एनएफडीसीची महोत्सवासोबतची भागीदारी आकर्षक कथानक  आणि तज्ञांच्या नेतृत्वाखालील ज्ञानाची देवाणघेवाण सत्रे आयोजित करून आपली प्रतिमा उंचावत आहे.

महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन सकाळी  9 वाजता होईल , त्यानंतर पर्यावरण जागरूकता वाढवण्यात सिनेमाचा लक्षणीय  प्रभाव दाखविणारे अनेक चित्रपट प्रदर्शित केले जातील. क्यूरेटेड चित्रपटांमध्ये संवर्धन, सागरी वारसा आणि महासागरांशी मानवी संबंध या विषयांचा शोध घेतला जाईल.

या वर्षीच्या महोत्सवाचे  वेगळेपण म्हणजे महाराष्ट्राच्या सागरी वारशावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे , ज्यामध्ये समर्पित चित्रपट प्रदर्शने आणि तज्ज्ञांचे व्याख्यान राज्याची समृद्ध किनारी संस्कृती, पर्यावरणीय आव्हाने आणि संवर्धन प्रयत्न अधोरेखित करतील. या विभागाद्वारे इकोलफोक्सचा उद्देश भारताच्या किनारी कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महोत्सवाचा एक व्यासपीठ म्हणून वापर करणे हा आहे.

महोत्सवाच्या  समारोपाच्या निमित्ताने हा महोत्सव सागरी सफर देखील घडवून आणेल. संध्याकाळी 4 वाजता, या महोत्सवातील सहभागी, गेटवे ऑफ इंडिया येथून सूर्यास्त पाहण्यासाठी सागरी  प्रवास सुरु करतील, ज्यामधून त्यांना महासागराच्या विशालतेचा आणि सौंदर्याचा एक मूर्त आणि तल्लीन करणारा अनुभव मिळेल.