गोवा खबर : गोवा सरकारचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (डीआयटीई अँड सी) खात्याचे स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल हे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स, प्रिंटिंग आणि स्टेशनरी मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय आमदार तथा इन्फो टेक कॉर्पोरेशन गोवाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत, २८ मार्च रोजी गोवा ओपन इनोव्हेशन चॅलेंज २०२५च्या (जीओआयसी २०२५) उदघाटनासाठी सज्ज आहे.
पर्यटन, कचरा व्यवस्थापन, कृषी, नाबार्ड, जीपीएससी आणि उद्योग यासारख्या क्षेत्रातील प्रमुख आव्हानांसाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाय विकसित करण्यास स्टार्टअप्स, विद्यार्थी, सरकारी संस्था आणि उद्योगांना एकत्र आणण्याचे या दोन महिन्यांच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या उदघाटन कार्यक्रमामध्ये स्टार्टअपला आवश्यक अंतर्दृष्टी देऊन सुसज्ज करण्यासाठी तज्ञांच्या नेतृत्वाखालील दोन मास्टरक्लास होतील. मुंबई एंजल नेटवर्क्सचे माजी अध्यक्ष आणि द ग्रेट युनिकॉर्न हंटचे संस्थापक सचिन कर्णिक यांचा “तुमच्या निधी उभारणीच्या प्रवासाची तयारी” या विषयावर मास्टरक्लास असेल. यात निधी उभारणीच्या मुख्य पैलूंचा समावेश असेल. ज्यामध्ये निधी उभारणीतील तोटे आणि चढ-उतार, निधी उभारणीची वेळ, निधी उभारणीचा शब्दकळा समजून घेणे, वास्तविक परिस्थितींमधील मूल्यांकन, भागधारक करार समजून घेणे आणि मूल्यमापनाच्या विसंगतींसाठी वाटाघाटी साधने यांचा समावेश आहे. कोका-कोला आणि कॅपिलरी टेक्नॉलॉजीजचा अनुभव असलेले वित्त अनुभवी, तसेच एक अग्रेसर गुंतवणूकदार, श्रीधर सुब्रमण्यन हे “प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्ससाठी अनुपालन सुलभ बनवणे” या विषयावर मार्गदर्शन करतील, ज्यात ते स्टार्टअपसाठी अनुपालन प्रक्रिया सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

याव्यतिरिक्त, “बिल्डिंग स्केलेबल स्टार्टअप्स फ्रॉम गोवा” या विषयावरील पॅनेल चर्चा ही स्केलिंग व्यवसायात प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उद्योग नेत्यांना एकत्र आणेल. पॅनेलच्या सदस्यांमध्ये टर्टलमिंटचे सह-संस्थापक आनंद प्रभुदेसाई यांचा समावेश असेल, जे सेक्वॉइया कॅपिटल आणि नेक्सस व्हेंचर पार्टनर्स सारख्या गुंतवणुकदारांचा पाठिंबा असलेल्या अग्रगण्य इन्सुरटेक स्टार्टअप आहे; प्रसाद वंगा, अँथिल व्हेंचर्सचे संस्थापक आणि सीईओ, मीडिया आणि एंटरटेनमेंट, हेल्थटेक, अर्बनटेक आणि कंझ्युमर ब्रँड्स यांसारख्या क्षेत्रातील स्टार्टअपला समर्थन देणारे स्पीड-स्केलिंग गुंतवणूक व्यासपीठ; रेनेविक सोलर या प्रख्यात सौरऊर्जा कंपनीचे इशान शर्मा, निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांतील उपायांमध्ये विशेषज्ञ; राहत कुलश्रेष्ठ, क्विडिच इनोव्हेशन लॅब्सचे सह-संस्थापक, क्रीडा प्रसारण आणि चित्रीकरणात आघाडीवर असलेली कंपनी, एआर, एआय, आणि एमएल ही आयसीसी, आयपीएल आणि नेटफ्लिक्ससह सहयोग करते आणि सुमित मित्रा, अध्यक्ष – मोल्बियो डायग्नोस्टिक्स इंटरनॅशनल सेल्स अँड मार्केटिंग, गोव्याच्या युनिकॉर्नचे प्रतिनिधित्व करत आहेत जी आरोग्यसेवा सुलभतेत क्रांती आणणारी, एक अग्रणी आण्विक निदान कंपनी आहे. एकत्रितपणे, हे तज्ञ स्टार्टअप वाढ, स्केलिंग आणि गोव्यातील स्केलिंगच्या संधी आणि आव्हाने यावर आपले विचार सामायिक करतील. चर्चेचे सूत्रसंचालन लेखिका, गुंतवणूकदार, सल्लागार वर्षा अदुसुमिल्ली करतील.
जीओआयसी २०२५च्या अधिकृत उदघाटनामध्ये वेबसाईटचा शुभारंभ आणि गोवा सरकारच्या स्टार्टअप अँड आयटी प्रमोशन सेलचे (एसआयटीपीसी) सीईओ श्री डी एस प्रशांत यांच्याद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करून सोडवता येणा-या समस्या विधानांवर, सर्व बाजूंनी चर्चा यांचा समावेश असेल.
गोवा ओपन इनोव्हेशन चॅलेंज २०२५च्या माध्यमातून, स्टार्टअप परिसंस्थेच्या वाढीस समर्थन देऊन स्टार्टअप्ससाठी महत्त्वपूर्ण बाजारपेठ उपलब्ध करून नवकल्पनेला चालना देणे, नवीन संधी निर्माण करणे आणि आघाडीचे तंत्रज्ञान केंद्र म्हणून गोव्याचे स्थान अधिक मजबूत करणे, हे खात्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.