गोवा खबर : वाहतूक संचालनालयाने जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या अपघातांची आणि जारी केलेल्या चलनांचा मासिक अहवाल तयार केला आहे.
अहवालानुसार, २११ रस्ते अपघात झाले, त्यापैकी २२ प्राणघातक अपघात (उत्तर गोवा – १२ आणि दक्षिण गोवा – १०), २८ गंभीर अपघात (उत्तर गोवा – १४ आणि दक्षिण गोवा – १४), ४४ किरकोळ अपघात (उत्तर गोवा – १५ आणि दक्षिण गोवा – २९) आणि ११७ दुखापत न झालेले अपघात (उत्तर गोवा – ५९ आणि दक्षिण गोवा – ५८) होते.

रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या २३ (उत्तर गोवा – १२ आणि दक्षिण गोवा – ११), ३० लोक गंभीर जखमी (उत्तर गोवा – १७ आणि दक्षिण गोवा – १३), तर ६८ जणांना किरकोळ दुखापत झाली (उत्तर गोवा – २९ आणि दक्षिण गोवा – ३९).
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ११ चालक (उत्तर गोवा ६ आणि दक्षिण गोवा – ५), ४ मागे बसलेले (उत्तर गोवा – १ आणि दक्षिण गोवा – ३), १ चालक (दक्षिण गोवा) आणि ४ पादचारी (उत्तर गोवा – ४) आणि २ प्रवासी (दक्षिण गोवा – २) यांचा समावेश आहे.