Connect with us

गोवा खबर

व्यावसायिक खाणकामासाठी कोळसा खाणींच्या लिलावाच्या 11 व्या फेरीत 12 खाणींचा यशस्वी लिलाव

Published

on

Spread the love

गोवा खबर : कोळसा मंत्रालयाने 5 डिसेंबर 2024 रोजी व्यावसायिक खाणकामासाठी कोळसा खाणींच्या लिलावाची 11वी यशस्वी फेरी करुन कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या प्रवासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले. याअतंर्गतच्या लिलावात एकूण बारा कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव करण्यात आला.

यामध्ये आठ पूर्णपणे उत्खनन केलेल्या खाणी आणि अंशतः उत्खनन केलेल्या चार कोळसा खाणींचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या दोन खाणींचाही समावेशही यात आहे.

या लिलावाचा खाणनिहाय निकाल खाली दिला आहे :

S. No. Name of Mine State PRC (MTPA) Geological Reserves (MT) Closing Bid Submitted By Reserve Price (%) Final Offer (%)
1 Jawardaha North Jharkhand NA 510.00 Jharkhand Exploration and Mining Corporation Limited 4.00 10.00
2 Dahegaon/Makardhokra-IV Maharashtra 0.6 121.00 Western Coalfields Limited 4.00 10.50
3 Saradhapur Jalatap East Odisha NA 3257.89 Jindal Steel And Power Limited 4.00 10.00
4 Namchik East Arunachal Pradesh 0.67 22.165 Innovative Mines and Minerals Limited 4.00 90.25
5 Marwatola-II Madhya Pradesh NA 119.718 Singhal Business Private Limited 4.00 24.50
6 Namchik West Arunachal Pradesh 0.34 8.802 Pra Nuravi Coal Mining Private Limited 4.00 21.50
7-8 Banai & Bhalumunda Chhattisgarh 12 1376.0757 Jindal Power Limited 4.00 48.00
9 Sahapur East Madhya Pradesh 0.7 63.363 Mineware Advisors Private Limited 4.00 20.25
10 Seregarha Jharkhand NA 187.290 Rungta Sons Private Limited 4.00 36.50
11 Vijay Central Chhattisgarh 0.4 56.750 Rungta Sons Private Limited 4.00 48.50
12 Bhandak West Maharashtra 0.75 36.178 New Era Cleantech Solution Private Limited 4.00 79.00

नव्याने लिलाव केलेल्या या खाणींमधून वार्षिक 3,330 कोटी रुपये इतका महसूल (अंशत: उत्खन्नन झालेल्या खाणी वगळून) मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सुमारे  2,319 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक आकर्षित होऊ शकेल तसेच 20,902 इतक्या रोजगाराच्या संधीही निर्माण होतील,त्यामुळे कोळसा क्षेत्र असलेल्या भागांच्या आर्थिक विकासात  महत्वपूर्ण योगदान मिळू शकेल.

वर्ष 2020 मध्ये व्यावसायिक कोळसा खाणकाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 125 कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव करण्यात आला आहे, याची उत्पादन क्षमता वार्षिक 273.06 दशलक्ष टन इतकी आहे. या खाणी कार्यान्वित झाल्यानंतर देशांतर्गत कोळशाचे उत्पादन वाढायला आणि देशाला कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यात मोठा हातभार लागू शकणार आहे. या खाणींमुळे देशाला वार्षिक 38 हजार 767 कोटी रुपयांचा महसूल मिळू शकेल, त्यासोबतच 40 हजार 960 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक होऊ शकेल आणि कोळसा उत्पादक क्षेत्राशी संबंधित 4 लाख 69 हजार 170 जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे.

व्यावसायिक कोळसा खाणींमधून होणाऱ्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 23-24 मध्ये कोळशाचे उत्पादन 12.55  मेट्रिक टन होते आणि आर्थिक वर्ष 24-25 मध्ये ते 22.35 मेट्रिक टन (आतापर्यंत) वाढले आहे,  म्हणजे उत्पादनात सुमारे 78.14 % वाढ झाली आहे.