भारतातील सर्वात कमी गुन्हेगारी दर नोंद असलेले शहर
गोवा खबर:भारतातील सर्वात जास्त मागणी असलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून गोव्याचा असलेला दर्जा लक्षात घेता, सुरक्षा ही गोव्याच्या प्रशासनात आघाडीवर आहे. कोणत्याही प्रवासी हॉटस्पॉटमध्ये गुन्हेगारी ही चिंतेची बाब असली तरी, गोव्याने नेहमीच कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आपली सक्रिय भूमिका कायम ठेवली आहे, ज्यामुळे रहिवासी आणि पर्यटक दोघांसाठीही सुरक्षित वातावरण सुनिश्चित होत आहे. अलीकडील आकडेवारी ही राज्याच्या उच्च गुन्हेगारी शोध दरावर प्रकाश टाकते, जो गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठीचा एक महत्त्वाचा घटक आहे. शिवाय, १३६४ ही पर्यटक हेल्पलाइन आणि पिंक फोर्स सारखे उपक्रम, गरज असलेल्यांना त्वरित मदत आणि सुरक्षा प्रदान करण्याची गोव्याची वचनबद्धता प्रतिबिंबित करतात.
*गोव्याला एक सुरक्षित प्रवासाचे स्थळ म्हणून राखण्यासाठी सरकारच्या अढळ वचनबद्धतेवर भर देत पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे म्हणाले*, की “सुरक्षा ही आमच्या पर्यटन धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. मजबूत पोलिस बंदोबस्त, जलद प्रतिसाद केंद्र आणि तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांसह, गोवा राज्य सर्व प्रवाशांना सुरक्षित अनुभव सुनिश्चित करण्यासाठी एक नवीन स्तर स्थापित करत आहे.”*

*गोवा सरकारच्या गृह खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार*, २०२१ मध्ये भारताचा राष्ट्रीय गुन्हेगारी दर प्रति १००,००० लोकांमागे ४४५.९ घटना होता, जो २०२० मध्ये प्रति १००,००० लोकांमागे ४८७.८ इतका होता. त्या तुलनेत, गोव्याने सातत्याने कमी गुन्हेगारी दर नोंदवला आहे, ज्यामुळे इतरांच्या तुलनेत सुरक्षित राज्य म्हणून गोव्याची प्रतिष्ठा बळकट झाली आहे. गोव्यातील कायदा अंमलबजावणी संस्थांनी २०२४ मध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये ९६.६% शोध दर आणि एकूण प्रकरणांमध्ये ८८% शोध दर साध्य केला आहे, जो राज्यातील प्रभावी पोलीस व्यवस्था दर्शवितो. गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी कडक कायदेशीर उपाययोजनांमुळे समस्यांवर नियंत्रण ठेवण्यात आणि त्यांचे निराकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
प्रवाशांसाठी एक मजबूत आधार प्रणालीची गरज ओळखून, गोवा पर्यटन खात्याने कायदा अंमलबजावणी संस्थांच्या सहकार्याने १३६४ ही पर्यटक हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. ही २४x७ बहुभाषिक सहाय्य सेवा, संकटात सापडलेल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी सुरु केली आहे. ही सेवा चोरी, छळवणूक, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आणि हरवलेल्या वस्तूंच्या बाबतीत त्वरित मार्गदर्शन प्रदान करते. ही हेल्पलाइन सुरु झाल्यामुळे पर्यटकांना विलंबाशिवाय मदत मिळवणे आणि त्यांच्या चिंता त्वरित दूर करणे, सोपे झाले आहे.

Celebrate the vibrant #ShigmotsavParade2025 as it travels across Goa from March 15-29
*पर्यटन संचालक श्री केदार नाईक यांनी गोव्याच्या पर्यटन आकर्षणात वाढ करण्यासाठी सुरक्षा उपक्रमांची भूमिका अधोरेखित करताना सांगितले*, की “जबाबदार आणि पुनरुत्पादक पर्यटनासाठी गोव्याची असलेली वचनबद्धता, पर्यटकांसाठी सुरक्षित अनुभव सुनिश्चित करण्यापर्यंत विस्तारीत आहे. १३६४ पर्यटक हेल्पलाइन आणि पिंक फोर्सचे एकत्रीकरण हे गोव्याला जागतिक दर्जाचे, सुरक्षित आणि प्रवासी-अनुकूल गंतव्यस्थान बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळकटी देते.”
गोव्यात महिलांची सुरक्षा ही प्राधान्याची बाब आहे, विशेषतः अशा ठिकाणी जेथे पर्यटकांची कायम वर्दळ असते. यावर उपाय म्हणून, गोवा पोलिसांनी पिंक फोर्सची सुरुवात केली आहे, जी महिला सुरक्षा आणि जलद प्रतिसाद यामध्ये विशेषज्ञता असलेली एक समर्पित युनिट आहे. प्रमुख पर्यटन स्थळे, सार्वजनिक ठिकाणी आणि वाहतूक केंद्रांवर गस्त घालणारी ही युनिट, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या महिलांना थेट मदत करण्यासाठी प्रशिक्षित आहे. पिंक फोर्सच्या उपस्थितीमुळे पर्यटक आणि स्थानिक महिला दोघांमध्येही सुरक्षिततेची भावना वाढली आहे, ज्यामुळे गोवा हे एकटे प्रवास करणाऱ्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनले आहे.
गोव्यातील सुरक्षितता ही केवळ गुन्हेगारीच्या आकडेवारीबद्दल नसून ती येथील रहिवासी आणि पर्यटकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी राबविलेल्या सक्रिय उपाययोजनांबद्दल आहे. उच्च गुन्हेगारी शोध दर, समर्पित पर्यटक हेल्पलाइन आणि पिंक फोर्ससारख्या विशेष सुरक्षा युनिट्ससह, राज्याने एक सुरक्षित आणि स्वागतार्ह वातावरण निर्माण करण्यासाठी वचनबद्धता दर्शविली आहे. गोवा जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असताना, सुरक्षित आणि प्रवासी-अनुकूल गंतव्यस्थान म्हणून राज्याची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी कायदा अंमलबजावणी, तंत्रज्ञान एकत्रीकरण आणि समुदाय-चालित सुरक्षा उपक्रमांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत.