Connect with us

गोवा खबर

डॉ. आंबेडकर सामाजिक पुरस्कारासाठी अर्ज

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारच्या समाज कल्याण संचालनालयाने अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी २५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ काम करणाऱ्या व्यक्तींकडून डॉ. आंबेडकर सामाजिक पुरस्कारासाठी अर्ज मागविले आहेत. या योजनेचा उद्देश म्हणजे अनुसूचित जातींच्या घटकांचा सामाजिक-आर्थिक, शैक्षणिक आणि सामान्य राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीस प्रोत्साहित करणे असा आहे.

इच्छुक उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असावे आणि त्यांनी गोव्यातील अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी काम केलेले असावे.

इच्छुक व्यक्तींनी विहित अर्ज नमुना समाज कल्याण संचालनालय, फार्मासिया साल्सेट समोर, १८ जून रोड, पणजी येथून मिळवावे. पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक दाखल्यांसह सादर करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२५ अशी आहे.