Connect with us

गोवा खबर

नवीन पिढी पारंपरिक मीठ व्यवसायात येण्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे : प्रवीण बगळी 

Published

on

Spread the love

गोवा खबर : प्रामाणिक काबाडकष्ट करून मेहनत केली तरी चार महिन्यात मीठ व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन पिढीने मीठ व्यवसायामध्ये आवड असेल, तर त्या व्यवसायात उतरावे, त्यात करिअर घडू शकते. सरकारी नोकरीपेक्षाही या व्यवसायामध्ये कमी वेळात कमी काळात जास्त मोबदला मिळू शकतो, असे मत तिसऱ्या पिढीतील पारंपरिक पद्धतीने मीठ व्यवसाय करणारे आगरवाडा येथील प्रवीण बगळी यांनी व्यक्त केले.

आगरवाडा पंचायत क्षेत्रात शापोरा नदीकिनारी भागात पूर्वी आठ मिठागरे अस्तित्वात होती. परंतु हल्ली काही व्यवसायिक मीठ व्यवसायाकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सध्या चार मिठागर सुरू असून काही पारंपरिक पद्धतीने मीठ व्यवसाय केला जातो. नवीन पिढी या व्यवसायात यायचे असेल तर त्याला अगोदर मनापासून आवड असायला हवी. मीठ व्यवसाय कसा करतो? त्यांनी पूर्वजांच्या सांगण्यावरून पूर्वजांच्या मार्गदर्शनावरून किंवा जरी एखादा नवीन व्यावसायिक आपल्याकडे आला तर आपण मीठ व्यवसाय कसा करता येईल? त्याविषयी आपण मार्गदर्शन देऊ शकतो. त्यासाठी मोफत मार्गदर्शन केव्हाही कधीही आपल्याकडे मिळू शकेल, असेआवाहन बगळी यांनी केले.

आगरवाडा मीठ व्यवसायामध्ये बगळी हे सर्वात प्रथम मिठागरातून मीठ उत्पादन घेत असतात. नोव्हेंबर महिना सुरू झाला की ते मिठागरापर्यंत धाव घेऊन जी प्राथमिक कामे असतात. ती कामे उरकून घेतात. आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मीठ उत्पादन करण्याचा विक्रम ते करत असतात. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात मीठ उत्पादन झाल्यामुळे जुन्या मिठालाही ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. सरकारने आर्थिक मदत करावी. अशी कुणाची इच्छा नसते. परंतु जो नवीन व्यावसायिक व्यवसाय करत असेल तर त्यांना काही प्रमुख अडचणी असतील त्या अडचणी सरकारने सोडवून त्यांना प्रोत्साहन द्यावे. अशी मागणी व्यावसायिक प्रवीण बगळी यांनी केली.

बगळी यांच्याकडे काही हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी मीठ व्यवसाय कसा केला जातो, यासाठी काय प्रक्रिया असते, याचा अभ्यास करण्यासाठी मिठागरापर्यंत येत असतात.