Connect with us

गोवा खबर

आरोग्यमंत्री राणे यांची गोमेकॉला अचानक भेट : सोयीसुविधांचा घेतला आढावा

Published

on

Spread the love

गोवा खबर : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल (13 रोजी) गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील पीएनआरसीमध्ये अचानक पाहणी करून सोयीसुविधांचा आढावा घेतला.

यासंदर्भात बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, पीएनआरसीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुलांना उत्तम न्युरोरिहॅबिलिटेशन सेवा मिळावी यासाठी सुविधा अद्ययावत केल्या जाणार आहेत. तसेच काही सेवांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे ठरवले आहे.

राणे यांनी रुग्णांना सेवा पुरवल्या जात आहेत, याची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी शिशूरोग विभागातील नवजात अतिदक्षता विभागाला भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधला. राज्यातील प्रत्येक वयोगटातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्यसेवा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे राणे यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले. नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेताना आवश्यक व दर्जेदार सेवा पुरवल्या जातील, याची खात्री करावी तसेच सातत्याने देखरेख ठेवून समस्या त्वरित सोडवाव्यात यासाठी वैद्यकीय अधीक्षकांना राणे यांनी निर्देश दिले.