Connect with us

गोवा खबर

रुग्णवाहिकेत झाली महिलेची प्रसूती

Published

on

Spread the love
  • ईएमटी रक्षंदा राणे व सहकार्‍यांची कामगिरी : आरोग्यमंत्र्यांनी केले कौतुक

गोवा खबर : गरोदर महिलेला साखळी येथील सामाजिक आरोग्य केंद्रातून आझिलोत नेताना वाटेतच रक्तस्राव होऊन पोटात दुखायला सुरू झाले. रुग्णवाहिकेत ड्युटीवर असलेल्या ईएमटी रक्षंदा राणे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अटेंडर आणि चालकाच्या मदतीने रुग्णवाहिकेतच त्या महिलेची यशस्वी प्रसूती केली.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले, रक्षंदा राणे व त्यांच्या सहकार्‍यांनी आपत्कालीन स्थिती लक्षात घेत महिलेची सुरक्षित प्रसुती केली, ही खरोखरच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यापूर्वी देखील राज्यात अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. यावेळीही आमच्या सक्षम कर्मचार्‍यांनी अशी गंभीर परिस्थिती हाताळण्यास सज्ज असल्याचे सिद्ध केले आहे.

ही महिला 40 आठवड्यांची गरोदर होती. तिला प्रसूतीसाठी नेत असतानाच पोटात दुखू लागले. प्रसंगावधान राखत राणे व त्यांच्या सहकार्‍यांनी तिची प्रसूती केली. त्यांना पुढील उपचारासाठी आझिलो इस्पितळात दाखल केले आहे. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.