गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी X या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये लिहिले की: “विज्ञानाबद्दल उत्साही असलेल्यांना, विशेषतः आपल्या तरुण नवोन्मेषकांना राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा. चला विज्ञान आणि नवोपक्रमांना लोकप्रिय करत राहूया आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी विज्ञानाचा वापर करत राहूया.”