Connect with us

गोवा खबर

व्यायामासाठी वेळ देणे आवश्यक : चाटे

Published

on

Spread the love

गोवा खबर : निरोगी माणूस म्हणजे निरोगी कुटुंब असून निरोगी समाजाकडे घेऊन जाते. प्रत्येक व्यक्तीने व्यायाम, योग, ध्यान, चालणे, सायकलिंग, एरोबिक्स, नृत्य, पारंपरिक, प्रादेशिक मार्शल आर्ट्स यासारख्या फिटनेस कार्यासाठी दररोज किमान एक तास घालवावा, असे आवाहन भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी केले.

भारत सरकारच्या क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाने गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने मिरामार समुद्रकिनार्‍यावर आयोजित केलेल्या फिट इंडिया योग ऑन बीच या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय क्रीडा प्राधिकरण महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश यांनी गोवा क्रीडा प्राधिकरण, प्रशिक्षण केंद्र म्हापसा पेडे, म्हापसा आणि फोंडा या दोन्ही साई वसतिगृहांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.

फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत सुमारे 325 विद्यार्थ्यांसाठी योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये शारदा मंदिर, साई वसतिगृह, (मुली) पेडे म्हापसा आणि साई वसतिगृह फोंडा येथील मुलांनी मिरामार किनार्‍यावर आयोजित सत्रात भाग घेतला.

चाटे यांनी फिटनेस हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे हे सरकारचे फिट इंडिया मिशन असल्याचे सांगितले. वर्तणुकीत बदल घडवून आणणे आणि अधिक शारीरिकदृष्ट्या सक्रिय जीवनशैलीकडे वाटचाल करणे हेही या चळवळीचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.

चाटे यांनी तंदुरुस्ती आणि विविध शारीरिक देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जागरूकतेचा प्रसार करण्याची गरज व्यक्त केली. महाविद्यालय, विद्यापीठ, पंचायत/गावात फिटनेस पोहोचण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात आणि नागरिकांना माहिती देण्यासाठी व्यासपीठ तयार करणे, जागरुकता वाढवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

फिट इंडिया मिशन यशस्वी करण्यासाठी चाटे यांनी सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत आणि उद्देश पूर्ण करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.

गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक डॉ. गीता नार्वेकर यांनी लोकांना निरोगी राहण्यासाठी चांगली जीवनशैली अंगिकारण्याचे आवाहन केले. तंदुरुस्तीचा अर्थ केवळ शारीरिक नसून मानसिक आणि भावनिक तंदुरुस्ती असल्याचे त्या म्हणाल्या.

चाटे यांनी उपस्थितांना फिटनेसची शपथ दिली. यावेळी अपूर्वा मंदा, शर्मिला उमेश, संपूर्णा डे आदींची उपस्थिती होती.