Connect with us

गोवा खबर

त्रिपुरारी पौर्णिमा राज्यस्तरीय बोट स्पर्धेचे निकाल जाहीर

Published

on

Spread the love

गोवा खबर : कला आणि संस्कृती संचालनालयाने 15 नोव्हेंबर रोजी विठ्ठलापूर, साखळी येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय बोट महोत्सवाचे निकाल जाहीर केले आहेत. प्रथम पारितोषिक कलयुगी बॉईज, विठ्ठलापूर साखळीने पटकावले. वाळवंटी, पोर्ये, सत्तरी यांना व्दितीय तर तळखमेश्वर बॉईज, पर्ये, सत्तरी यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले आहे. चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक रवळनाथ बॉईज, पर्ये, सत्तरी यांना तर पाचवे पारितोषिक वाटारेश्वर बॉईज, पर्ये, सत्तरी यांना मिळाले आहे.

प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक काल्कीन, कारापूर, डिचोली, व्दितीय पारितोषिक साईराज पेडणेकर, तुळशीमाला, पर्ये, सत्तरी, तृतीय पारितोषिक भूतनाथ बॉईज, आमोणा, चौथे पारितोषिक रघुवंश कला संघ, कुंभारजुवा, आणि पाचवे पारितोषिक तळेश्वर बॉईज, पर्ये सत्तरी यांना देण्यात आले.

युनिक बॉईज, पर्ये, सत्तरी, कविशा रॉयल, पर्ये, सत्तरी, शिव बॉईज, विठ्ठलापूर, साखळी, पार्वती नगर युवक, सर्वण साखळी, दिपेश फोगेरी, डिचोली, जय भवानी, पर्ये, सत्तरी, स्वयंभू बॉईज विठ्ठलापूर, साखळी, राजवाडा रॉयल, विठ्ठलापूर, साखळी, वरुण पक्षी, विठ्ठलापूर, कारापूर, साखळी आणि बाबा टेक्नॉलॉजी, आमोणा यांना मानधन देण्यात आले.

सनशाईन, डेड डेव्हिल, एंजल बॉईज आणि गणराज बॉईज यांना सहभाग भत्ता देण्यात आला. राज्यस्तरीय बोट स्पर्धेचे परीक्षक गोवा कॉलेज ऑफ फाइन आर्ट, पणजीचे साहाय्यक प्राध्यापक सागर गावडे, गोपाळ कुडसकर आणि राजेश चोडणकर होते.

कला आणि संस्कृती संचालनालयाने पर्यटन खाते, गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि माहिती व प्रसिद्धी खाते, दीपावली उत्सव समिती आणि श्री देव विठ्ठल पंचायतन देवस्थान, विठ्ठलापूर साखळी, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन केले होते.

बक्षिसांचे वितरण स्वतंत्र कार्यक्रमात करण्यात येणार असून स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख व ठिकाण नंतर कळविण्यात येईल.

सहभागींनी डिझाइन केलेल्या एकूण 24 बोटी या बोट स्पर्धेचा भाग होता. दहा हजारांहून अधिक प्रेक्षक यावेळी उपस्थित होते. बोट स्पर्धेशिवाय, सा रे ग म, कोल्हापूर यांची संगीत मैफल, योगिता गावंडे यांचे भरतनाट्यम, सर्वेश फडके यांचे कराओके गायन, साई कृपा मोर्ले कॉलनी सत्तरी गोवा यांचे दीप नृत्य, नदीतील दीपदान, भगवान श्रीकृष्ण आणि विठ्ठल रखुमाईची मिरवणूक. पारंपारिक सारंगा आकाशात सोडणे, त्रिपुरासूराचा पुतळा जाळणे, दशावतारी नाटकाचे सादरीकरण ही यंदाच्या महोत्सवातील इतर आकर्षणे होती.

या महोत्सवाला कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पर्यटनमंत्री रोहन खवंटे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, कला आणि संस्कृती संचालक सगुण आर. वेळीप, साखळीच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू पोरोब, कारापूर सरवणच्या सरपंच तन्वी सावंत, दीपावली उत्सव समितीचे अध्यक्ष दिनेश उसपकर आणि इतर उपस्थित होते.