हिंदु राष्ट्र समन्वय समितीची आमदार डॉ.चंद्रकांत शेट्ये यांच्याकडे यांच्याकडे आवाहन
गोवा खबर: जुने गोवे येथील ‘हातकातरो खांबा’चे एक ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करावे. ‘हात कातरो’ खांबाच्या संरक्षणासाठी त्याला संरक्षक कुंपण करावे. खांबाची निगा राखणे आणि संरक्षण करणे यांसाठी व्यवस्था करावी. खांबाच्या शेजारी खांबाचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणारा ठसठशीतपणे दिसेल, असा पितळी अथवा दगडी फलक लावावा, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्याकडे केली आहे.
या वेळी समितीच्या वतीने आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना मागणीविषयी एक निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री सत्यवान म्हामल, विजय होबळे, गोविंद चोडणकर, युवराज गावकर, कृष्णा मराठे, सिद्धेश्वर नाईक, शिरगावकर, निलेश परब आदींचा समावेश होता.

पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून गोमंतकियांवर अनन्वित अत्याचार केले. याविषयी सर्वत्र जागृती करण्यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समिती गोव्यात ठिकठिकाणी जागृतीपर उपक्रम घेणार आहेत. या अंतर्गत समितरने बोर्डे, डिचोली येथील श्री रवळनाथ देवस्थानच्या सभागृहात १६ नोव्हेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी ६ वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये विशेष अतिथि या नात्याने उपस्थित रहाणार आहेत.

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनाही दिले निवेदन
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने वास्कोचे आमदार श्री. कृष्णा साळकर यांनाही ‘जुने गोवे येथील ‘हातकातरो खांबा’चे ऐतिहासिक वारसा म्हणून जतन आणि संरक्षण करण्याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री संजू कोरगावकर आणि नितीन फळदेसाई यांचा समावेश होता.