Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून ओणम सणाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना आणि विशेषत: केरळ आणि जगातील इतर केरळीयन समाजातील बांधवाना ओणम सणाच्या शुभ आणि आनंदाच्या प्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.   

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, ओणम हा केरळ राज्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. ओणम सण प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचे प्रतिक आहे. केरळच्या लोकांद्वारे साजरा केला जाणारा हा कापणीचा उत्सव असून हा उत्सव केरळ बांधव धर्म किंवा पंथ भेदभाव न करता साजरा करतात. आपल्या राज्यासाठी उदात्तपणे बलिदान दिलेल्या राजा महाबलीचे आपल्या घरवापसीचे प्रतीक म्हणून हा ओणम सण साजरा करतात.

ओणम हा १० दिवसांचा सण आहे जो बंधुभाव आणि सांस्कृतिक बंधन मजबूत करतो. लोकांना ऐक्याचे महत्त्व समजावून देतो. ओणमच्या उत्सवातून समता, एकता वाढीस लागते. मन आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते.

या वर्षीचा ओणम सण आपण सर्वाना अपार आनंद, सुख आणि समृध्दी घेऊन येवो, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.