Connect with us

गोवा खबर

गोवा राज्य डेटा पायाभूत सुविधा प्रकल्प लवकरच कार्यान्वित: डॉ. अंकित यादव

Published

on

Spread the love

 गोवा खबर:विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन खात्याचे संचालक आणि गोवा सरकारचे संयुंक्त सचिव डॉ. अंकित यादव, आयएएस, गोवा राज्य रिमोट सेन्सिंग केंद्र लवकरच गोवा राज्य डेटा पायाभूत सुविधा प्रकल्प राबविणार आहे असे सांगितले. गोवा राज्य रिमोट सेन्सिंग सेंटर, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभाग, सरकारच्या संयुक्त विद्यमाने हेक्सागॉन इंडिया टेक्निकल समिटचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. गोव्यातील सरकारी अधिकारी आणि शहरातील शैक्षणिक संस्थांसाठी या परिसंवादाचे आयोजन केले होते.

डॉ. यादव यांनी गोवा राज्य रिमोट सेन्सिंग केंद्र राष्ट्रीय जियोस्पेशल धोरण २०२२ च्या अनुषंगाने डेटा संकलन आणि सामायिकरणासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते. त्यांनी कृषी, भूनोंदणी, खाणकाम आणि आपत्ती व्यवस्थापन यासह विविध क्षेत्रांमध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर भर दिला असे सांगितले. गोव्याची विस्तृत किनारपट्टी आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली आव्हाने लक्षात घेता, या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक भौगोलिक-स्थानिक तंत्रज्ञान लागू करता येते असे त्यांनी निदर्शनास आणले. सर्व खात्याना या तंत्रज्ञानाचा शोध घेण्याची आणि एकत्रित करण्याची मौल्यवान संधी उपलब्ध करून देते असे ते म्हणाले.

गोवा राज्य रिमोट सेन्सिंग सेंटरच्या संचालक डॉ ब्रेंडा फर्नांडिस यांनी स्वागतपर भाषण केले. हेक्सॅगॉन इंडियाचे मार्केटिंग आणि सेल्स एक्सलन्स संचालक श्री मनोज शर्मा यांनी जागतिक स्तरावर डिजिटल रिॲलिटी सोल्यूशन्समध्ये हेक्सॅगॉनच्या नेतृत्वावर प्रकाश टाकला. त्यांनी हेक्सॅगॉनचे सेन्सर्स, सॉफ्टवेअर आणि स्वायत्त तंत्रज्ञानाचे नाविन्यपूर्ण एकत्रीकरण ग्राहकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या डेटाच्या विस्तारित व्हॉल्यूमचा प्रभावीपणे वापर करण्यास सक्षम करते असे सांगितले. औद्योगिक प्रक्रिया, उत्पादन, पायाभूत सुविधांचा विकास, सार्वजनिक सेवा आणि मोबिलिटी सोल्यूशन्स यासारख्या विस्तृत क्षेत्रांमध्ये कार्यक्षमता, उत्पादकता, गुणवत्ता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी या डेटाचा धोरणात्मक वापर केला जातो अशी त्यांनी माहिती दिली.

पोलर रिमोट सेन्सिंग सेक्टरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ आल्वारिन्हो जे लुईस यांनी पोलर रिमोट सेन्सिंग विभागाच्या संशोधन उपक्रमांची माहिती दिली.

श्री. नरिंदर थापर, मॅपल्स जिओसिस्टम्स, मॅपमायइंडिया वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. नरिंदर थापर यांनीही सहभागींसोबत संवादात्मक सत्रात भाग घेतला.

याप्रसंगी मत्स्योध्योग खात्याच्या संचालिका आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शर्मिला मोंतेरो, हेक्सागोन तसेच विविध सरकारी खात्यांचे अधिकारी आणि उपस्थित होते.