गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकारी यांनी २३ जून २०२४ रोजी मतदानाच्या दिवशी सकाळी ६.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत आणि २४ जून २०२४ रोजी मतमोजणीच्या दिवशी सकाळी ६.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत सासष्टी तालुक्यातील १२ बाणावली जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात असलेली तसेच कुंडई ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ७, वळवई प्रभाग क्रमांक २, केरी ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ३, फोंडा तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ११, राशोल ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ५: सेरावली ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक २, सासष्टी तालुक्यातील असोल्णा ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक १ आणि केपे तालुक्यातील शेल्डे ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक २ मध्ये पोटनिवडणूक होणार असल्याने सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार, भोजनालये, चहाची दुकाने, पान दुकाने इत्यादी उपरोक्त तारखेला आणि वेळेत बंद राहतील. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास किंवा गर्दी करण्यासही बंदी घातली आहे.
कामावरील लोकसेवक, परवानगी मिळविलेले लग्न सोहळे, अंतविधी किंवा कोणताही खास प्रसंग किंवा जिल्हा न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी, उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मताप्रमाणे विश्वसनीय प्रसंग ज्याना संबंधित जिल्हा न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी किंवा उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांकडून पूर्व लेखी परवानगी घेतली आहे त्यांना ही बंदी लागू नसेल.आदेशाचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अंतर्गत दंडात्मक कारवाई जबाबदार करण्यात येईल.