गोवा खबर: मुंबई येथे आशियातील प्रमुख ट्रॅव्हल ट्रेड शो ओटीएम 2024 सध्या सुरू आहे. या ट्रेड शो मध्ये गोवा पर्यटन विभागाने देशात पुनर्संचयित पर्यटन सुरू करणारे पहिले राज्य म्हणून आपल्या मोहिमेचे प्रदर्शन केले.
मुंबई येथे ओटीएम 2024 मधील गोवा पर्यटन विभागाच्या दालनाने पर्यटन पद्धतींना चालना देणाऱ्या राज्याच्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. पुनर्संचयित पर्यटन तत्त्वांनुसार चिन्हांकित केलेल्या दृष्टिकोनातून शाश्वत विकासासाठी गोव्याचे समर्पण या नेपथ्यामध्ये चित्रित करण्यात आले आहे.
एकादश तीर्थ यात्रा, नवीन होमस्टे धोरण, कारवां धोरण, वारसा जतन, उत्साही सण साजरे करणे, पर्यटकांना समृद्ध स्थानिक संस्कृतीत समरस करणे, रोमांचकारी साहसी संधी उपलब्ध करून देणे आणि गोव्यात जागतिक दर्जाच्या मीटिंग्स, इनसेंटीव्ह, कॉन्फ्रेंसेस, एक्झिबिशन अर्थात एमआयसी ई (MICE) सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेले उपक्रम ही काही ठळक वैशिष्ट्ये होती. जी ओटीएम ट्रेड शोच्या गोवा पर्यटन विभागाच्या दालनामध्ये प्रदर्शित करण्यात आली.

Goa Tourism Department
#ADVt गोव्यात आज पासून किंग मोमोची राजवट.. आज पासून कार्निव्हलची सुरुवात.. पर्वरी येथे आज कर्टन रेझर..!
विद्यमान उपक्रमांवर प्रकाश टाकण्याव्यतिरिक्त, गोवा पर्यटन विभागाने विविध पर्यटकांच्या आवडी पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेल्या नवीन पर्यटन सेवा सुरू करण्यावर प्रकाशझोत टाकला, ज्याचा उद्देश शाश्वत पद्धतींचा प्रचार करताना अभ्यागतांना अद्वितीय आणि संस्मरणीय अनुभव प्रदान करणे हा आहे. प्रदर्शनादरम्यान गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेल्स आणि सेवांचाही प्रचार करण्यात येतो.

“ओटीएम 2024 मधील आमचा सहभाग ही केवळ पुनर्संचयित पर्यटनासाठीची आमची बांधिलकीच नव्हे तर आम्ही देऊ करत असलेल्या रोमांचक नवीन उपक्रम आणि सेवा देखील प्रदर्शित करण्याची एक अपवादात्मक संधी होती,” असे गोवा पर्यटन विभागाचे संचालक श्री. सुनील अंचिपाका, IAS, यांनी सांगितले. “एकादश तीर्थ मोहीम आणि नवीन पर्यटन सेवा आणि धोरणे यांसारख्या नाविन्यपूर्ण पध्दतींद्वारे, आम्ही शाश्वत आणि अभ्यागतांच्या समाधानाला प्राधान्य देणारे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचे स्थान आणखी सशक्त करत आहोत.”
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट एक उत्तम व्यासपीठ तयार करणे आहे जिथे चर्चा आणि सहयोगाला प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे भागधारकांसोबत भागीदारी दृढ करता येईल आणि शाश्वत पर्यटन पद्धतींमध्ये एक प्रबळ नेतृत्व म्हणून गोव्याचे स्थान निश्चित करता येईल. राज्याने आपल्या पर्यटन उपक्रमांचा विकास करणे सुरू ठेवल्यामुळे, नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपत्तीचे जतन आणि संवर्धन करता येईल जेणेकरून भविष्यातील पिढ्यांना पर्यटनाचा आनंद घेता येईल.