Connect with us

गोवा खबर

स्मार्ट सिटीच्या कामात झालेल्या उल्लंघनाबाबतची चौकशी करा: चोडणकर 

Published

on

Spread the love
गोवा खबर: रायबंदर येथे कम्युनिटी मार्केटचे काम करताना, इमेजिन स्मार्ट सिटीने उल्लंघन केल्याचे उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने (एनजीपीडीए) म्हटले आहे आणि कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या उल्लंघनाची चौकशीची मागणी कॉंग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 
“स्मार्ट सिटीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अनेक वेळा काँग्रेस नेत्यांनी केला आहे, आता एनजीपीडीएने ‘इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट’च्या चुकीच्या कामांचा पर्दाफाश केला आहे, ज्यांनी बांधकाम प्रक्रियेचे उल्लंघन केले आहे,” असे चोडणकर म्हणाले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, इमेजिन स्मार्ट सिटीने रायबंदरमधील कम्युनिटी मार्केटचे काम करताना  इमारत नियमांचे उल्लंघन केले आहे.
“या मार्केटच्या आराखड्याला एनजीपीडीएने मान्यता दिली होती, मात्र इमेजिन स्मार्ट सिटीने त्याचे  उल्लंघन केले आहे,” असे चोडणकर म्हणाले.
“ या प्रकारा वरुन  मुख्यमंत्री प्रमोद सावंत  सत्तेचा दुरूपयोग कसे करत आहे ते दिसत आहे. मान्यतेनंतर जबाबदार अधिकारी कामाचा आराखडा बदलू शकतात का? हे स्पष्ट उल्लंघन आहे,” असे चोडणकर म्हणाले.
” अशा प्रकाराने सार्वजनिक निधीच्या दुरुपयोग केला जात आहे. यासाठी असे प्रकार घडताना जबाबदार कोणाला धरायचे? आम्ही या उघड उल्लंघनाची त्वरित चौकशी करण्याची मागणी करतो, ”असे चोडणकर म्हणाले.
चोडणकर म्हणाले की, “पणजीचे भाजप आमदार आणि महसूल मंत्री बाबुश  मोन्सेरात यांनी पणजी ‘स्मार्ट सिटी’चे सुरू असलेले काम दर्जाहीन असल्याचे मान्य केले होते. आता भ्रष्टाचाराबरोबरच बेकायदेशीर रित्याही काम केले जात आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आहे,” असे  ते म्हणाले.
“दुहेरी इंजिन सरकार प्रगती करू शकते असा सावंत दावा करतात, पण गोव्यात ही इंजिने बेकायदेशीर आणि भ्रष्टाचारात गुंतलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे,” असा आरोप चोडणकर यांनी केला.