Connect with us

गोवा खबर

गेल्या वर्षी चॅम्पियन ठरलेल्या शाळा एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉन २०२३ साठी उत्सुक

Published

on

Spread the love

 

 

 गोवा खबर: गेल्या वर्षी ज्या शालेय संघांनी सर्वाधिक बक्षिसे जिंकली होती, ते एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनच्या १३व्या आवृत्तीची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही मॅरेथॉन रविवार १० डिसेंबर रोजी चिखली येथे होणार आहे.

 

एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनचे लोकप्रिय आयोजक असणाऱ्या वास्को स्पोर्ट्स क्लबने गेल्या वर्षीपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी, मुली आणि मुलांसाठी ५ किमीची १७ वर्षांखालील वयोगटातील शर्यत सुरू केली होती. प्रत्येक शाळेला चार धावपटू उभे करण्याची परवानगी आहे. सर्वोत्तम सरासरी वेळेवर आधारित सर्वात वेगवान वैयक्तिक धावपटू आणि वेगवान संघांना बक्षिसे दिली जातात.

वास्कोच्या मुरगाव हायस्कूलने गेल्या वर्षी अनेक बक्षिसे जिंकली होती. त्यांच्या मुलांचा संघ सर्वात वेगवान ठरला, तर त्यांच्या मुलींचा संघ दुसरा आला. २०:५१ मिनिटांच्या प्रभावी वेळेसह मागील वर्षी मुलांचा सर्वात वेगवान धावपटू विकास पाल म्हणाला, “मी या शर्यतीचा आनंद घेतो .कारण सराव उत्कृष्ट आहेत . आणि हा मार्ग अतिशय निसर्गरम्य आहे.” त्यांचे प्रशिक्षक, विवेक नाईक यांनी सांगितले की त्यांचे संघ गेल्या दोन महिन्यांपासून सराव करत आहेत आणि १० डिसेंबर रोजी अनेक पदके जिंकण्याचा त्यांना विश्वास आहे.

कुठठाळीच्या विद्या विहार हायस्कूलनेही गेल्या वर्षी अनेक पदके जिंकली होती. त्यांच्या मुलींचा संघ गेल्या वर्षी सर्वात वेगवान ठरला होता. सुरवी गावकर, इयत्ता दहावीची विद्यार्थिनी म्हणाली, “मला ही शर्यत खूप आवडते, कारण मार्गावर बरेच लोक तुम्हाला प्रोत्साहन देत आहेत.” त्यांचे प्रशिक्षक दीपक वेंकटप्पा म्हणाले की, त्यांचा संघ स्वतःचे मैदान नसतानाही दररोज एक तास सराव करत होता.

 

५ किमी शालेय शर्यतीत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शाळांनी खालील ईमेलवर वास्को स्पोर्ट्स क्लबशी संपर्क साधावा: runnersingoa@gmail.com