गोवा खबर:गोवा सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाने, भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या समन्वयाने जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ च्या पार्श्वभूमीवर भारत कौशल्य स्पर्धा २०२३ मध्ये भाग घेत आहे आणि त्यासाठी गोवा राज्यात स्क्रीनिंग स्तर, जिल्हा स्तर आणि राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा आयोजित करणार आहे. ही कौशल्य स्पर्धा सप्टेंबर २०२४ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी निवडीचे प्राथमिक टप्पे आहेत. गोवा राज्यातील नवोदित आणि महत्त्वाकांक्षी कलावंतांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची आणि राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून देण्याची ही एक अनोखी संधी आहे .

नोंदणीसाठी उमेदवार/स्पर्धकांसाठी स्पर्धकांचा जन्म १ जानेवारी २००२ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा . गोव्यासाठी पर्यटन क्षेत्रातील निवडक कौशल्ये पॅटीसेरी आणि कन्फेक्शनरी, रेस्टॉरंट सेवा, पाककला, बेकरी, हॉटेल रिसेप्शन, सौंदर्य आणि निरोगीपणा क्षेत्रात सौंदर्य थेरपी आणि केशभूषा, कपडे क्षेत्रात फॅशन तंत्रज्ञान, भांडवली वस्तू क्षेत्रात वेल्डिंग आणि रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग हे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा समावेश आहे.

नोंदणीसाठी लिंक https://www.skillindiadigital.gov.in/home आहे. नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ अशी आहे.
अधिक माहितीसाठी परीक्षा कक्ष, कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय, तिसरा मजला, श्रमशक्ती भवन, पाटो-पणजी येथे संपर्क साधावा.