Connect with us

गोवा खबर

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या क्रीडा साहित्याचा योग्य वापर करण्यावर भर देणार : गावडे

Published

on

Spread the love
गोवा खबर:  नुकत्याच संपलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीच्या साहित्याचा व साधनांचा योग्य वापर करण्याला प्राधान्य देणार असल्याचे  क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील काही प्रकार जेथे आयोजित करण्यात आले, त्या फोंडा क्रीडा संकुलाची पाहणी केल्यावर गावडे बोलत होते.

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अधिकृतपणे संपल्या आहेत, मात्र यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा आणि क्रीडा साहित्य सांभाळणे ही मोठी जबाबदारी आहे. जर्मन हेंगर्स नीटपणे काढून ठेवावे लागतील तर साधनांची स्वच्छता करताना खबरदारी घ्यावी लागेल. जेथे आवश्यक आहे, तेथे नव्याने पेव्हर्स बसविण्याचे निर्देश मी दिले आहेत. हे सर्व योग्य पद्धतीने करून घेण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल, त्यासाठीच माझी ही भेट असल्याचे गावडे यांनी सांगितले. ज्या ठिकाणी क्रीडा स्पर्धा झाल्या, त्या जागांना लवकरच भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी कांपाल येथील क्रीडाग्राम नगरीला भेट दिली आहे. कंत्राटदाराला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. सामुग्री उतरविण्यासाठी आणि तेथून काढण्यासाठी ७-८ दिवस आणखी लागतील. कचरा आणि बाटल्यासारखे प्लास्टिक तेथून काढून स्वच्छता करावी लागणार आहे. ही आपली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
क्रीडाविषयक पायाभूत सुविधा सांभाळून ठेवल्यास त्याची किंमत वाढणार असल्याचे ते म्हणाले.
क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याचे संचालक, कार्यकारी संचालक तसेच अन्य स्टाफ हे सर्व साधनसामुग्री सांभाळण्यास जबाबदार असतील. साहित्याची नोंद ठेवावी लागणार आहे. ही साधने पुन्हा कशी वापरता येतील, त्याचे नियोजन करण्यात येणार आहे, प्रत्येक अधिकाऱ्याशी बोलणे शक्य नसते. साहित्याची हानी झाल्यास प्रशिक्षक आणि कर्मचारी यांच्यासह प्रत्येकाला मी जबाबदार धरीन, असे गावडे यांनी सांगितले.
मी क्रीडा हा विषय अत्यंत गांभिर्याने घेतला आहे. यावर गोव्यातील करदात्याचे पैसे गुंतले आहेत. त्यामुळे जशी आपण घरातील वस्तूंची काळजी घेतो तशी खबरदारी क्रीडा साहित्याची घ्यावी लागणार आहे, त्यालाच माझे प्राधान्य राहील, असे ते म्हणाले.