Connect with us

गोवा खबर

माय आधार  पोर्टलद्वारे आधार अध्ययावत करण्याचे आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर:नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालयाने नवी दिल्लीतील युआयडीएआयने  माय आधार या पोर्टलद्वारे विनामूल्य सेवा उपलब्ध केली आहे. १४ डिसेंबर २०२३ पर्यंत ही सेवा विनामुल्य असेल. मंजूर केलेल्या नाममात्र शुल्क रु. ५०/- भरून आधार अपडेट सेवा युआयडीएआयची मान्यता असलेल्या कोणत्याही आधार केंद्रावर मिळवू शकतात.

नागरिकांनी आधार नोंदणी केलेल्या तारखेपासून १० वर्षानी आधारमध्ये ओळखपत्र पुरावा आणि पत्ता आणि इतर पुराव्यासह एकदा तरी आधार कार्ड अध्ययावत करण्याचा सल्ला दिला आहे. आधार अद्ययावत ठेवल्याने राहणीमान सुलभ होते, उत्तम सेवा, अचूक प्रमाणीकरण आणि आधार डेटाबेसमधील माहिती अचूक राहते.

त्यामुळे सर्वसामान्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या आधार कार्डाची माहिती अध्ययावत करून घ्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.