Connect with us

गोवा खबर

३ री अखिल गोवा आंतरमहाविध्यालयीन, उच्च माध्यमिक तियात्र स्पर्धा २०२३-२४

Published

on

file photo
Spread the love

गोवा खबर: गोवा तियात्र अकादमीने ४ सप्टेंबर २०२३ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत रवींद्र भवन मडगाव येथे दुपारी ३.३० वाजल्यापासून तिसरी अखिल गोवा आंतरमहाविध्यालयीन आणि उच्च माध्यमिक तियात्र स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन केले आहे.

       ४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता उद्घाटन समारंभ होणार असून माजोर्डाच्या जिल्हा पंचायतच्या माजी अध्यक्षा श्रीमती नेली रॉड्रीगीस प्रमुख पाहुणे असतील आणि बाणावली जिल्हा पंचायतच्या माजी अध्यक्षा श्रीमती मारीया लुझ रिबेलो या सन्माननीय पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील.

४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता डीसीटीच्या एसएस डेम्पो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, कुजिरा गोवा येथे तियात्र देव निदोंक ना, ८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता आग्नेल उच्च माध्यमिक विद्यालय, पिलार गोवा येथे तियात्र धोंडो, ९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता सेंट झेवियर्स कॉलेज म्हापसा येथे तियात्र गिराण, ११ सप्टेंबर २०२३ रोजी पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय कला आणि विज्ञान, घोगळ, मडगाव येथे तियात्र उलोवपाक जाय, १२ सप्टेंबर २०२३ रोजी फादर आग्नेल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, पिलार गोवा येथे आयएम सॉरी, १४ सप्टेंबर २०२३ रोजी रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, नावेली, सासष्टी येथे तियात्र सान्कोव्ह, १५ सप्टेंबर २०२३ रोजी कला अकादमी थिएटर आर्ट्स, कांम्पाल, पणजी गोवा येथे तियात्र दायज सादर होईल. हे सर्व तियात्र दुपारी ३.३० वाजता सादर होतील आणि १८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता सेंट जोस वाझ कॉलेज, कुठ्ठाळी गोवा येथे तियात्र अटेंशन प्लीज सादर होईल. सर्व तियात्र प्रेमींना हार्दिक निमंत्रण आहे.