Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांहस्ते पशूसंवर्धन अस्थापनाना दुचाक्यांचे वितरण  

Published

on

Spread the love

 गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पशुवैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी आणि अंत्योदयाच्या तत्त्वाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पशूसंवर्धन खात्याचे मंत्री श्री निळकंठ हळर्णकर यांच्या उपस्थितीत पर्वरीतील सचिवालयातील मंत्रालयात पशूसंवर्धन खात्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पशूवैध्यकिय अस्थापनाना २१ दुचाक्यांचे वितरण करून बावटा दाखविला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिकांना चोवीस तास सेवा देण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेवर भर दिला. दुचाकींचे वितरण केल्याने पशुवैद्यकीय सहाय्यक आणि डॉक्टरांना जनावरांच्या उपचारासाठी आणि गरजू शेतकर्‍यांच्या मदतीस जाण्यास मदत होईल. या योजनेमुळे गोव्यातील पशुवैद्यकीय सेवेत वाढ होईल असे डॉ.सावंत यांनी सांगितले.

कार्यक्रमात श्री नीळकंठ हळर्णकर यांनी स्वागतपर भाषण केले आणि विधानसभेत चर्चा केल्याप्रमाणे डिचोली, पणजी आणि चिखली या तीन ठिकाणी पशुवैद्यकीय रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

पशुसंवर्धन सचिव श्री सरप्रीत सिंग गिल, आयएएस आणि पशुसंवर्धन खात्याचे कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सूत्रसंचालन श्री ब्रिजेश देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा संचालक डॉ. आगोस्तिन्हो मिस्किटा यांनी केले.